बँक ऑफ इंडिया असोसिएशनची वार्षिक सभा; मुंबई, गोवा येथील अधिकारी उपस्थित!
30-Oct-2024
Total Views |
मुंबई : बँक ऑफ इंडिया ऑफिसर्स असोसिएशनच्या मुंबई व गोवा युनिटची ५२ वी वार्षिक सर्वसाधारण सभा पार पडली. दि. २० ऑक्टोबर २०२४ रोजी बालगंधर्व रंग मंदिर, वांद्रे येथे आयोजित सभेस मुंबई तसेच गोवा आणि रायगड येथून सुमारे बँकेच्या सुमारे ११०० अधिकाऱ्यांचे स्वागत करण्यात आले. असोसिएशनचे अध्यक्ष अँटोन सलदान्हा, सरचिटणीस नीलेश पवार यांच्या मार्गदर्शनाखाली सभा पार पडली.
दरम्यान, या सभेत बँकिंग क्षेत्रातील प्रमुख समस्यांवर प्रकाश टाकून बहुमुल्य विचार प्रसिद्ध ट्रेड युनियन नेत्यांनी मांडले. वाढते हल्ले आणि बँकिंग क्षेत्रातील अलीकडील तांत्रिक परिवर्तन यांचा समावेश वार्षिक सभेत करण्यात आला. त्याचप्रमाणे, बँकेने हाती घेतलेल्या विविध कर्मचारी कल्याणकारी उपाय आणि एचआर ट्रान्सफॉर्मेशन प्रकल्पांची माहिती दिली.
बँक ऑफ इंडियाचा ६१ वर्षांचा गौरवशाली प्रवास पूर्ण करत ५२ व्या वार्षिक सभेस एआयपीएनबीओएचे सचिव दिलीप साहा, फेडरेशन ऑफ बँक ऑफ इंडिया ऑफिसर्स असोसिएशनचे अध्यक्ष जी नागेश्वर, कार्याध्यक्ष श्वेतांग त्रिवेदी, अध्यक्ष संजय दास तसेच बँक ऑफ इंडियाचे मुख्य महाव्यवस्थापकांसह इतर पदाधिकारी देखील यावेळी उपस्थित होते.