मुंबई (विशेष प्रतिनिधी) : (Mira Road Attack) मुंबईत ऐन दिवाळी दरम्यान जातीय तणाव निर्माण होऊन दोन समाज समोरासमोर आल्याचे निदर्शनास आले आहे. मीरा रोड परिसरात फटाके फोडण्यावरून वाद झाल्याने परिसरात तणाव परिस्थिती निर्माण झाली होती. काही धर्मांधांनी धारदार शस्त्रांनी हल्ला केल्याचा आरोप हिंदूंकडून करण्यात आला आहे. या वादाचा व्हिडिओही सोशल मीडियावर व्हायरल होत असून पोलिसांनी याबाबत तपास सुरू केला आहे.
हे वाचलंत का? : रेल्वे रुळावर डिटोनेटर ठेवल्याचा संशय
सदर व्हिडिओ २७ ऑक्टोबर रोजी एक्स प्लॅटफॉर्मवरून व्हायरल करण्यात आला होता. त्यामध्ये घराबाहेर फटाके फोडणाऱ्या हिंदूंवर धर्मांधांच्या एका गटाने हल्ला केल्याचे स्पष्ट दिसत आहे. धारदार शस्त्रांसह सुमारे १० ते १२ हल्लेखोरांनी हिंदूंना लक्ष्य केले होते. सध्या जखमी झालेल्या तीन हिंदूंची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांहण्यात येत आहे.
व्हायरल व्हिडिओत एक पीडितने दिलेल्या माहितीनुसार, फटाके फोडणाऱ्या हिंदू युवकाला धर्मांधांनी येऊन शिवीगाळ करत फटाके का फोडत आहात, अशी विचारणा सुरू केली. त्यानंतर फटाके फोडणाऱ्या दहा जणांवर चाकूने हल्ला केल्याचे पीडिताचे म्हणणे आहे. याप्रकरणी पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली असून चौकशी होत आहे.