झिशान सिद्दिकी धमकी प्रकरणात पोलिसांची मोठी कारवाई; नोएडामधून एकाला अटक

    29-Oct-2024
Total Views |
zishan siddique threat case police


मुंबई : 
     गेल्या काही आठवड्यापूर्वी राष्ट्रवादीचे नेते बाबा सिद्दिकी यांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. त्यानंतर एकच खळबळ माजली होती. बाबा सिद्दिकी यांचे पुत्र झिशान सिद्दिकी यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली असून यांसदर्भात नोएडा येथून एकाला अटक करण्यात आली आहे. या धमकीबाबत झीशान सिद्दीकी यांच्या कार्यालयातील कर्मचाऱ्याने पोलिसांत तक्रार दाखल केली.




दरम्यान, धमकीप्रकरणी अटक करण्यात आलेल्या मोहम्मद तय्यब याने सलमान खान आणि बाबा सिद्दीकी यांचा मुलगा जीशानला जीवे मारण्याची धमकी दिली. झिशान यांना वांद्रे येथील कार्यालयात एक संदेश प्राप्त झाला यात त्यांना आणि सलमान खान यांच्याकडे खंडणीची मागणी करण्यात आली. तसेच, खंडणी न दिल्यास जीवे मारण्याची धमकी देण्यात आली. मागील काळापासून जीवे मारण्याच्या धमक्या मिळाल्याचे प्रकरणे समोर येत आहेत.

पोलिसांत तक्रार दाखल केल्यानंतर या प्रकरणाचा तपास सुरू आहे. तपासानंतर पोलिसांनी मोहम्मद तय्यब नावाच्या व्यक्तीला उत्तर प्रदेशातील नोएडा येथून अटक केली आहे. या प्रकरणानंतर पोलिसांनी बंदोबस्त वाढवला असून प्रकरणी कसून तपास सुरू आहे. त्याचबरोबर, याआधीच मुंबई पोलिसांच्या क्राईम ब्रांचने झारखंडच्या जमशेदपूर येथून एका तरुणाला अटक केली होती. दरम्यान, राष्ट्रवादीचे नेते बाबा सिद्दीकी यांचा १२ ऑक्टोबर २०२४ रोजी झालेल्या जीवघेण्या हल्ल्यात मृत्यू झाला होता.