हैदराबादमध्ये आतापर्यंत ३.५ लाख लोकांचे ट्रॅकिंग सिस्टमद्वारे चर्चमधून धर्मांतरण

    29-Oct-2024
Total Views |
hyderabad-church-converting
 

मुंबई :      सीबीएन न्यूज(ख्रिस्तियन ब्रॉडकास्टिंग नेटवर्क)चा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चर्चेत आला आहे. व्हिीडीओ व्हायरल झाल्यानंतर हैदराबाद येथील कॅलव्हरी चर्च पुन्हा एकदा चर्चेत आल्याचे दिसून आले आहे. कॅलव्हरी चर्च येण्याचे मुख्य कारण म्हणजे दर महिन्याला ३ हजारांहून अधिक हिंदूंचे धर्मांतर करण्यात आल्याचा दावा केला जात आहे.


दरम्यान, चर्चच्या माध्यमातून आतापर्यंत ३.५ लाख हिंदूंचे धर्मांतर केल्याचा दावा कॅलव्हरी चर्च चालविणारे पाद्री सतीश कुमार यांनी केला आहे. आगामी काळात आणखी ४० कॅलव्हरी चर्च आयोजित करण्याची योजना असून याला राष्ट्रीय स्वयंसेवक संघाकडून जोरदार विरोध करण्यात येत आहे. दर महिन्याला ३ हजारांहून अधिक हिंदूचे धर्मांतर होत असून ट्रॅकिंग सिस्टमद्वारे लोक जमा केली जात असल्याचे समोर आले आहे.

महत्त्वाचे म्हणजे हैदराबादच्या कलवरी चर्चमधून धर्मांतराचा खेळ सुरू असून ट्रॅकिंग सिस्टमद्वारे लोक गोळा केले जात आहेत. पत्रकार देविका यांनी हा व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला असून त्यानंतर कायदेशीर हक्क संरक्षण मंचानेही याची गंभीर दखल घेतली आहे. काकीनाडा जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानंतर या चर्चची डिजिटल शाखा सील करण्यात आली आहे. या चर्चबद्दल काही तक्रारी आहेत का, याबाबत कुठलीही माहिती अद्याप मिळालेली नसून मुख्य चर्च व्यतिरिक्त आणखी १० शाखा सुरू असल्याचे समोर आले आहे.