यंदा गुंतवणूकदार अनुभवणार 'आयपीओ'वाली दिवाळी; जाणून घ्या संपूर्ण तपशील
27-Oct-2024
Total Views |
मुंबई : मागील काळापासून भारतीय भांडवली बाजारात आयपीओचा प्रचंड ओघ दिसून येत आहे. त्यातच आता दिवाळीच्या मुहूर्तावर आणखी नवीन आयपीओज बाजारात दाखल होण्याची शक्यता आहे. येत्या काळात विविध क्षेत्रातील कंपन्या त्यांचे आयपीओ लवकरच बाजारात आणण्याच्या तयारीत आहेत. शेअर बाजारात आगामी काळात एनटीपीसी ग्रीन एनर्जी, Acme Solar, Mobikwik, Sagility India सारख्या प्रसिद्ध कंपन्यांचे आयपीओज सबस्क्रिप्शनकरिता गुंतवणूकदारांसाठी खुले होणार आहेत.
दिवाळीनंतर शेअर बाजार आयपीओमुळे व्यस्त राहण्याची शक्यता असून गुंतवणूकदार आयपीओमध्ये गुंतवणूक करण्याचा विचार करताना दिसून येत आहेत. दिवाळीनंतर पुढील कंपन्या शेअर बाजारात उतरणार आहेत.
NTPC ग्रीन एनर्जी IPO
NTPC ग्रीन एनर्जी लिमिटेड ही भारतातील सर्वात मोठी नूतनीकरणक्षम सार्वजनिक क्षेत्रातील कंपनी आहे. कंपनी सद्यस्थितीस परिचालन क्षमता आणि ऊर्जा उत्पादनाच्या बाबतीत आघाडीवर असून कंपनीकडे १४,६९६ मेगावॅटच्या प्रकल्पांचा पोर्टफोलिओ आहे. २,९२५ मेगावॅट आधीच कार्यरत असून ११,७७१ मेगावॅटचे प्रकल्प करारबद्ध झाले आहेत. NTPC ग्रीनचे प्रकल्प अनेक राज्यांमध्ये असून सौर आणि पवन ऊर्जा क्षेत्रात कार्यरत आहेत.
वन मोबिक्विक सिस्टम्स लि.
One Mobikwik Systems Ltd हे भारतातील एक अग्रगण्य पेमेंट प्लॅटफॉर्म आहे, जे ग्राहक आणि व्यापारी यांना जोडते. Mobikwik आर्थिक समावेशावर लक्ष केंद्रित करत असून Kwik QR, EDC Machines आणि Merchant Cash Advance सारखे उपाय ऑफर करते. उपकंपनी, Zaakpay, ई-कॉमर्ससाठी B2B पेमेंट गेटवे चालविते याकरिता आरबीआयकडून पेमेंट एग्रीगेटर परवान्यासाठी मान्यता दिली जाते.
Acme Solar Holdings IPO
Acme Solar Holdings Ltd ही भारतातील अग्रगण्य अक्षय ऊर्जा उत्पादक कंपन्यांपैकी एक आहे. याची सुरुवात सौर प्रकल्पांपासून झाली असून अक्षय उर्जेच्या इतर क्षेत्रांमध्येही काम करत आहे. कंपनी आपल्या प्रकल्पांचे अभियांत्रिकी, खरेदी, बांधकाम आणि देखभाल कंपनी करते. Acme राज्य आणि केंद्र सरकारच्या एजन्सींना वीज विकून त्याचे उत्पन्न मिळवते.
Sagility India IPO
Sagility India Ltd ही आरोग्यसेवा-केंद्रित तंत्रज्ञान कंपनी आहे, जी रुग्णालये आणि आरोग्य सेवा कंपन्यांना सेवा पुरवते. हे 2021 मध्ये बेंगळुरूमध्ये लॉन्च करण्यात आले होते. कंपनी दावे व्यवस्थापन, क्लिनिकल सेवा आणि महसूल चक्र व्यवस्थापन यासारख्या सेवा देते. याशिवाय फार्मसीशी संबंधित कामातही मदत करते.