आयपीओच्या जबरदस्त इंट्रीनंतर आता गुतवणूकदारांमध्ये धास्तीचं वातावरण; नेमकं प्रकरण काय?
27-Oct-2024
Total Views |
मुंबई : 'वारी एनर्जीज लिमिटेड'चा आयपीओ बाजारात दाखल झाल्यानंतर गुंतवणूकदारांकडून चांगला प्रतिसाद मिळाला. २१ ते २३ ऑक्टोबर दरम्यान सबस्क्रिप्शनसाठी खुला होत प्रचंड प्रतिसाद मिळाल्याचे पाहायला मिळाले होते. परंतु, आता गुंतवणूकदारांची धाकधूक वाढलेली दिसते आहे. एकंदरीत, ग्रे मार्केटमधील आकडे पाहता कंपनीचे शेअर कितीला बाजारात लिस्ट होणार आहे, याकडे बाजारातील तज्ज्ञांचे लक्ष लागले आहे.
वारी एनर्जीज ग्रे मार्केटमध्ये जवळपास २३ टक्क्यांनी घसरल्याचे समोर आले आहे. वारी एनर्जीजचा समभागात मोठी घसरण दिसत असताना दुसरीकडे याच कारणामुळे गुंतणूकदारांमध्ये प्रचंड धाकधूक पाहायला मिळत आहे. जीएमपीमध्ये वारी एनर्जीजचा समभाग २३ टक्क्यांची घट त्यामुळे ग्रे मार्केटमध्ये होत असलेले बदल आणि सध्याची परिस्थिती विचारात घेता बाजार तज्ज्ञ याकडे कसं पाहतात तर कंपनीचा समभाग किती किमतीला लिस्टिंग होणार हे पाहणे महत्त्वाचे असेल.
दरम्यान, वारी एनर्जीज ही कंपनी आयपीओच्या माध्यमातून ४,३२१.४४ कोटी रुपये बाजार भांडवल उभारणार आहे. दि. २१ ते २३ ऑक्टोबर दरम्यान आयपीओ गुंतवणुकीसाठी खुला होता. या कालावधीत आयपीओला दमदार प्रतिसाद मिळाला असून आयपीओ ७९.४४ पटीने सबस्क्राईब करण्यात आला. आयपीओच्या माध्यमातून कंपनीने एकूण ३,६०० कोटी रुपयांचे नवे समभाग जारी केले आहेत.