क्रिप्टोकरन्सीच्या प्रभावामुळे आर्थिक अस्थिरतेचा धोका; आरबीआय गव्हर्नर दास यांचा इशारा

    26-Oct-2024
Total Views |
crypto currency rbi stand



मुंबई :   
  आर्थिक स्थिरतेसाठी क्रिप्टोकरन्सी(आभासी चलन) मोठा धोका ठरू शकतो, असे विधान रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया(आरबीआय)चे गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी केले आहे. आभासी चलनामुळे अर्थव्यवस्थेतील पैशाच्या पुरवठ्यावर मध्यवर्ती बँक नियंत्रण गमावून बसू शकते, अशी परिस्थिती भविष्यात निर्माण होऊ शकते, असेही गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी सांगितले.




दरम्यान, आंतरराष्ट्रीय बाजारात क्रिप्टोकरन्सीचा वाढता पसारा पाहता आरबीआय गव्हर्नरांचे विधान अतिशय महत्त्वाचे ठरते. वॉशिंग्टन डी.सी. स्थित पीटरसन इन्स्टिट्यूट फॉर इंटरनॅशनल इकॉनॉमिक्स या थिंक टँकमध्ये उपस्थित आरबीआय गव्हर्नरांनी आर्थिक स्थिरतेवर भाष्य केले. क्रिप्टो ही अशी गोष्ट आहे जिला आर्थिक व्यवस्थेवर वर्चस्व गाजवू दिले जाऊ नये. कारण यामुळे आर्थिक स्थिरतेला मोठा धोका निर्माण होत बँकिंग व्यवस्थेलाही धोका निर्माण होतो, असेही ते यावेळी म्हणाले.

दास म्हणाले, मला वाटते अजून काम करणे आवश्यक आहे. आम्ही क्रिप्टोकरन्सीबद्दल त्यांच्या गंभीर चिंता स्पष्टपणे व्यक्त करणाऱ्या पहिल्या केंद्रीय बँकांपैकी एक आहोत असे सांगताना क्रिप्टो आर्थिक स्थिरतेसाठी मोठी जोखीम म्हणून पाहतो. क्रिप्टोच्या संभाव्य धोक्याची काही कारणे देखील आमच्याकडे आहेत, बँकिंग अधिकारी म्हणून सरकार खाजगी स्तरावर निर्णय घेण्यास तयार आहे का, हा मूलभूत प्रश्न आहे, असेही त्यांनी सांगितले.