मुंबई : महाराष्ट्र विधानसभा निवडणूकीच्या अनुषंगाने उबाठा गटाने दुसरी यादी जाहीर केली आहे. १५ उमेदवारांची ही यादी असून यात ५ महिलांना संधी देण्यात आली आहे. दरम्यान, भायखळा विधानसभा मतदारसंघात यंदा शिंदे विरुद्ध ठाकरे असा सामना रंगणार आहे.
याआधी उबाठा गटाने ६५ उमेदवारांची दुसरी यादी जाहीर केली होती. त्यानंतर आता उबाठा गटाने जाहीर केलेल्या दुसऱ्या यादीनुसार, चोपडा, बुलढाणा, दिग्रस आणि भायखळा या चार जागांवर शिंदे आणि ठाकरे यांच्यात थेट लढत राहणार आहे. या लढतीत कोण बाजी मारणार? याकडे सर्वांचेच लक्ष लागून आहे.
हे वाचलंत का? - काँग्रेसची दुसरी यादी जाहीर! २३ उमेदवारांना संधी
उबाठा गटाने जाहीर केलेली दुसरी यादी पुढीलप्रमाणे :
१) शिवडी - अजय चौधरी
२) धुळे शहर - अनिल गोटे
३) चोपडा - राजू तडवी
४) जळगाव शहर - जयश्री महाजन
५) बुलढाणा - जयश्री शेळके
६) दिग्रस - पवन जयस्वाल
७) हिंगोली - रुपाली पाटील
८) परतूर - आसाराम बोराडे
९) देवळाली - योगेश घोलप
१०) कल्याण पश्चिम - सचिन बासरे
११) कल्याण पूर्व - धनंजय बोडारे
१२) वडाळा - श्रद्धा जाधव
१३) भायखळा - मनोज जामसुतकर
१४) श्रीगोंदा - अनुराधा नागावडे
१५) कणकवली - संदेश पारकर