शरद पवार गटाची २२ उमेदवारांची दुसरी यादी जाहीर!

    26-Oct-2024
Total Views |
 
Sharad Pawar
 
मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाची २२ उमेदवारांची दुसरी यादी जाहीर झाली आहे. प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी शनिवार, २६ ऑक्टोबर रोजी पत्रकार परिषद घेत उमेदवारांच्या नावांची घोषणा केली. तसेच पुढील यादी आज रात्री किंवा उद्यापर्यंत जाहीर करणार असल्याचे सांगितले.
 
पहिल्या यादीत शरद पवार गटाकडून ४५ उमेदवारांच्या नावाची घोषणा करण्यात आली होती. त्यानंतर आता दुसऱ्या यादीत येवला विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसच्या छगन भुजबळ यांच्याविरोधात शरद पवार गटाकडून माणिकराव शिंदेंना उमेदवारी देण्यात आली आहे. तर जुन्नरमध्ये अतुल बेनके यांच्याविरोधात सत्यशील शेरकर यांना तिकीट मिळाले.
 
हे वाचलंत का? - बच्चू कडू यांना धक्का! प्रदेशाध्यक्ष अनिल गावंडे यांचा भाजपमध्ये प्रवेश
 
शरद पवार गटाची यादी पुढीलप्रमाणे :
 
१) एरंडोल – सतीश अण्णा पाटील
२) गंगापूर – सतीश चव्हाण
३) शहापूर – पांडुरंग बरोरा
४) परांडा – राहुल मोटे
५) बीड – संदीप क्षीरसागर
६) आर्वी – मयुरा काळे
७) बागलान – दीपिका चव्हाण
८) येवला – माणिकराव शिंदे
९) सिन्नर – उदय सांगळे
१०) दिंडोरी – सुनीताताई चारोसकर
११) नाशिक पूर्व – गणेश गिते
१२) उल्हासनगर – ओमी कलानी
१३) जुन्नर – सत्यशील शेरकर
१४) पिंपरी – सुलक्षणा शिलवंत
१५) खडकवासला – सचिन दोडके
१६) पर्वती – अश्विनीताई कदम
१७) अकोले – अमित भांगरे
१८) अहिल्यानगर शहर – अभिषेक कळमकर
१९) माळशिरस – उत्तम जानकर
२०) फलटण – दीपक चव्हाण
२१) चंदगड – नंदिनीताई कुपेकर
२२) इचलकरंजी – मदन कारंडे