मुंबई (विशेष प्रतिनिधी) : (Congress Leader on Illegal Mosque) हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंड या राज्यांसह विविध राज्यात बेकायदेशीर मशिदींविरोधात हिंदू समाज संघटित होऊन पुढे येऊ लागलाय. परंतु हिंदूंच्या संघटित होण्याने काँग्रेसची पोटदुखी वाढली आहे. देश या दिशेने पुढे जाऊ शकत नाही. जर ही परिस्थिती सुधारली नाही तर भारत गृहयुद्धात अडकू शकतो, असे विधान काँग्रेस नेते रशीद अल्वी यांनी केले आहे.
हे वाचलंत का? : यूपीमध्ये तीन ठिकाणी सामूहिक धर्मांतरणाचा पर्दाफाश!
दिल्लीत पत्रकारांशी बोलताना राशिद अल्वी म्हणाले की, भाजपशासित राज्यांमध्ये मशिदींबद्दल वाढता द्वेष पाहून मी दु:खी आणि चिंतीत आहे. मशिदी पाडण्याची मागणी सर्वत्र होत आहे. एकीकडे मुस्लिम देशांमध्ये मंदिरे बांधली जात असताना दुसरीकडे भारतात मशिदींना लक्ष्य केले जात आहे. ही परिस्थिती फार काळ टिकू शकत नाही, त्याचे गंभीर परिणाम होऊ शकतात. अशा घटना देशाला गृहयुद्धाकडे घेऊन जात आहेत. मशिदी आणि मंदिर या दोन्हींची सुरक्षा आवश्यक असून सर्व धार्मिक स्थळांचे संरक्षण करणे ही सरकारची जबाबदारी आहे.
हिंदू संघटना बेकायदा बांधकामांविरोधात आंदोलन करत असून सरकारकडे कारवाईची मागणी करत असतानाच राशिद अल्वी यांचे हे वक्तव्य आले आहे. अशी प्रकरणे विशेषतः उत्तराखंड आणि हिमाचल प्रदेशात नोंदवली गेली. नुकतेच शिमल्यात एक बेकायदेशीर मशिदीचे बांधकाम पाडण्यात आले. त्याचवेळी बेकायदेशीर मशीद पाडण्याची मागणी करत उत्तरकाशीमध्ये हिंदूंनी जोरदार निदर्शने केली आहेत.