‘होम चार्जिंग’चा जागतिक ट्रेंड

Total Views |

Home charging trends
 
होम चार्जिंग’ पॉईंट हे सध्या इलेक्ट्रिक कार चार्ज करण्याचे सर्वसामान्य माध्यम. सुसज्ज असलेल्या खासगी पार्किंगच्या जागेत चार्जिंगसाठी परवानगी असलेले ईव्ही मालक रात्रभर आपली गाडी या पॉईंटवरुन चार्ज करू शकतात. ‘होम चार्जिंग’च्या उपलब्धतेत लक्षणीयरित्या बदल होत आहेत. हे बदल शहरी, उपनगरी आणि ग्रामीण लोकसंख्येनुसार आणि त्यांच्या आर्थिक उत्पानांशी जोडलेले आहेत.
 
होम चार्जिंग’ पॉईंट हे सध्या इलेक्ट्रिक कार चार्ज करण्याचे सर्वसामान्य माध्यम. सुसज्ज असलेल्या खासगी पार्किंगच्या जागेत चार्जिंगसाठी परवानगी असलेले ईव्ही मालक रात्रभर आपली गाडी या पॉईंटवरुन चार्ज करू शकतात. ‘होम चार्जिंग’च्या उपलब्धतेत लक्षणीयरित्या बदल होत आहेत. हे बदल शहरी, उपनगरी आणि ग्रामीण लोकसंख्येनुसार आणि त्यांच्या आर्थिक उत्पानांशी जोडलेले आहेत. दाट शहरांमध्ये, जिथे बहुतेक लोक बहु-युनिट निवासस्थानामध्ये राहतात, त्याभागात ‘होम चार्जिंग’चा वापर मर्यादित आहे. अशा ठिकाणी ईव्ही मालक सार्वजनिक चार्जिंगवर अधिक अवलंबून असतात. द. कोरियामध्ये हे सर्वाधिक आढळून येते. द. कोरिया हा जगातील सर्वात दाट लोकवस्तीचा देश. मात्र, याठिकाणी सार्वजनिक चार्जिंग सुविधांचा वापर करण्याचे प्रमाण सर्वाधिक आहे.
 
युनायटेड किंग्डम हा ‘होम चार्जिंग’च्या ऍक्सेसचा सर्वाधिक नोंद असणारा देश आहे. स्मार्ट चार्ज पॉईंट नियम जारी करणारा हा पहिला देश असल्यामुळे या देशात सर्वाधिक स्मार्ट चार्जर आहेत. जगभरातील ईव्ही मालकांमध्ये ‘होम चार्जिंग’च्या वापराची एक विशिष्ट ‘प्रॉक्सी’ आहे. ज्यांचे स्वतःच्या मालकीचे आहे, अशी व्यक्ती होम चार्जर पर्याय स्वीकारते. नॉर्वेमध्ये नवीन कार विक्रीमध्ये ईव्हीचा वाटा ९० टक्क्यांपेक्षा जास्त आहे, तर मेक्सिकोमध्ये तो दोन टक्क्यांपेक्षा कमी आहे. भारतात 55 टक्के ग्राहकांकडे आज ‘होम चार्जिंग’ची सुविधा आहे.
 
ज्या देशात पॉवर ग्रिडचा व्होल्टेज 220 व्होल्ट किंवा त्याहून अधिक आहे, अशा ईव्हीचे मालक त्यांचे वाहन रात्रभर नियमित घरगुती सॉकेटमधून चार्ज करू शकतात. युरोप, ऑस्ट्रेलिया, लॅटिन अमेरिकेचा मोठा भाग आणि आशियातील बहुतेक भागांमध्ये इलेक्ट्रिक वाहनांच्या चार्जिंगसाठी हीच पद्धती विकसित झालेली आहे. ज्या प्रदेशांमध्ये व्होल्टेज कमी आहे, म्हणजेच सामान्यत: १००-१२० व्होल्ट इतके आहे, अशा नियमित घरगुती सॉकेटमधून रिचार्जिंगचा वेग खूपच कमी असतो. त्यामुळे अशावेळी वाहनांच्या सुरक्षिततेला धोका निर्माण होऊ शकतो. १००-१२० व्होल्ट पॉवर ग्रिड असलेल्या देशांमध्ये दहा तासांच्या आत रिचार्ज करण्याच्या क्षमतेसाठी समर्पित चार्जर स्थापित करणे आवश्यक आहे. ही सुविधा अमेरिका (८३टक्के) आणि कॅनडा (८०टक्के) या देशांमध्ये आहे. मात्र, इंडोनेशिया, कोस्टा रिका आणि कोलंबिया यांसारख्या विकसनशील देशांचाही यात समावेश आहे. मात्र, खासगी पार्किंगमध्ये जागेची कमतरता यामुळे खासगी चार्जरच्या स्थापनेत महत्त्वपूर्ण अडथळे येऊ शकतात. अमेरिकेमध्ये असे, १५ हजार, ९०० खासगी नॉन-होम चार्जर आहेत. युरोपियन युनियनमध्ये २ लाख, ५० हजार पेक्षा जास्त चार्जर्सना प्रतिबंधित प्रवेश आहे.
 
अनेक देशांमध्ये ‘होम चार्जिंग’च्या पायाभूत सुविधा चांगल्या प्रकारे प्रस्थापित असताना भारत आणि आशियाई देशांमध्ये ईव्हीचा साठा आणि विक्री वाढत आहे. या वाढत्या बाजारपेठांमध्ये बॅटरी स्वॅपिंग तंत्रज्ञानामध्ये विशेषत: भारतात वाढ होत आहे. २०२३ सालामध्ये, चायनीज तैपेई-आधारित बॅटरी-स्वॅपिंग कंपनी ‘गोगोरो’ने भारतात महाराष्ट्रामध्ये अमेरिकन डॉलर २.५ अब्ज इतक्या भागीदारीची घोषणा केली. ‘गोगोरो’चा स्मार्ट बॅटरी पायाभूत सुविधा प्रकल्प स्थापित करण्यासाठी अमेरिकन डॉलर १.५ अब्जांपेक्षा जास्त गुंतवणूक करण्याचा मानस आहे. ज्यामध्ये बॅटरी स्वॅपिंग स्टेशनचा समावेश असेल. सन मोबिलिटी आणि बॅटरी स्मार्टसारख्या इतर भारतीय स्टार्टअप्सनी बॅटरी स्वॅपिंग पायाभूत सुविधांच्या विस्ताराच्या प्रयत्नांत आहेत, तर आफ्रिकेने इलेक्ट्रॉनिक दुचाकीसाठी बॅटरी-स्वॅपिंग तंत्रज्ञानामध्ये वाढीव गुंतवणूक केली आहे. ‘अँपरसँड’, एक रवांडा-आधारित कंपनी, सध्या किगाली आणि नैरोबीमध्ये दर आठवड्याला १.४ दशलक्ष किमी प्रवास करणार्‍या १ हजार, ७०० पेक्षा जास्त ग्राहकांना १ लाख, ४० हजार मासिक बॅटरी स्वॅप करते. ‘स्पिरो’, एक आफ्रिकन इलेक्ट्रिक दुचाकी स्टार्ट-अप, त्याच्या इलेक्ट्रिक फ्लीटचा विस्तार करण्यासाठी प्रयत्नशील आहेत. यामध्ये खासगी चार्जर सुविधा सर्वाधिक असल्या तरी सार्वजनिक चार्जिंग स्टेशन ईव्ही वापरास प्रोत्साहन देण्यासाठी आवश्यक आहे. युरोपियन युनियनने प्रस्तावित केल्याप्रमाणे चार्जर अनिवार्य करण्यासाठी बिल्डिंग नियमांमधील बदल करणे, हा कालांतराने ईव्ही वाहनांकडे कल वाढविण्याचा एक प्रभावी मार्ग आहे. याचा फायदा विशेषत: भाड्याच्या निवासस्थानात राहणार्‍या लोकांसाठी होईल.

गायत्री श्रीगोंदेकर

मूळची अहमदनगर येथील. 'राज्यशास्त्र' विषयातील पदवी. रानडे इन्स्टिट्यूटमधून (सा.फु.पुणे विद्यापीठ) 'एमजेएमसी' विषयातून पदव्युत्तर शिक्षण. सध्या मुंबई तरुण भारतमध्ये 'मंत्रालय प्रतिनिधी' या पदावर कार्यरत.