औक्षण 'विजयाचे'! उमेदवारी अर्ज दाखल करण्यापूर्वी कुटूंबियांकडून फडणवीसांचे औक्षण
25-Oct-2024
Total Views |
नागपूर : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी दक्षिण-पश्चिम नागपूर विधानसभेतून शुक्रवारी अर्ज दाखल करणार आहेत. त्यापूर्वी फडणवीसांनी त्यांच्या आईचे आशीर्वाद घेतले. तसेच त्यांच्या पत्नी अमृता फडणवीस आणि मुलगी दिवीजा यांनी त्यांचे औक्षण केले.
उमेदवारी अर्ज दाखल करण्यापूर्वी भव्य नामांकन रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे. नागपूर येथील संविधान चौक ते आकाशवाणी चौक अशी ही भव्य रॅली आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे हेदेखील फडणवीसांच्या रॅलीमध्ये सहभागी झाले आहेत.
दक्षिण-पश्चिम नागपूर विधानसभा मतदारसंघ हा देवेंद्र फडणवीसांचा बालेकिल्ला मानला जातो. ते सलग पाचवेळा इथून विजयी झाले आहेत. यावर्षी ते सहाव्यांदा उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. या मतदारसंघात देवेंद्र फडणवीसांच्या विरोधात काँग्रेसच्या प्रफुल गुडधे यांना तिकीट देण्यात आले आहे. मात्र, फडणवीसांच्या बालेकिल्ल्यात त्यांचा निभाव लागतो का? हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.