पंतप्रधान नरेंद्र मोदींना धमकी देणाऱ्या इम्रान मसूदच्या अडचणीत वाढ

    24-Oct-2024
Total Views |

Imran Masood
 
सहानरपूर : उत्तर प्रदेशातील सहानरपूर येथील काँग्रेस खासदार इम्रान मसूद (Imran Masood) यांच्या अडचणीत वाढ झाली. सहानरपूरच्या आमदरांनी २०१४ च्या लोकसभा निवडणुकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर केलेल्या अशोभनिय टिप्पणीबद्दल त्यांच्यावर आरोप निश्चित करण्यात आले आहेत. आता याप्रकरणात न्यायालयात सुनावणी होणार आहे.
 
या प्रकरणी मोहित शर्मा यांच्या प्रकरणात १९ जणांचे जबाब नोंदवण्यात आले. आता याप्रकरणात इम्रान मसूदने १० वर्षांपूर्वी देवबंदमधील एका गावात रॅलीदरम्यान वादग्रस्त विधान केल्याबाबत ही घटना आहे. त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर वादग्रस्त विधान केले होते. ते म्हणाले होते की, नरेंद्र मोदी इथे आले तर त्यांचे तुकडे केले जातील या निवेदनात त्यांनी गुजरात आणि सहानरपूर येथील काही कट्टरपंथी लोकांचा यामध्ये समावेश असल्याचा उल्लेख केला आहे.
 
पोलिसांनी याप्रकरणी १५३ ए, २९५ ए, ५०४, ५०६, ३(१), १० एससी\ एसटी कायदा आणि १२५ लोकप्रतिनिधी कायद्यान्वये आरोपपत्र न्यायालयात सादर केली आहेत. याप्रकरणी आता सरकारी वकील गुलाब सिंह म्हणाले की, कलमांतर्गत दोषी आढळल्यास ३ ते ७ वर्षांची शिक्षा होण्याची शक्यता आहे. पुढील तपासात साक्षीसादारीची साक्ष घेऊन हे प्रकरणात पुढील तपास करण्यात येईल अशी माहिती आहे.