अहेरीत यंदा बाप विरुद्ध लेक सामना रंगणार!

    24-Oct-2024
Total Views |
 
Atram
 
गडचिरोली : अहेरी विधानसभा मतदारसंघात यंदा राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटात बाप विरुद्ध लेक असा सामना रंगणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. याठिकाणी अजित पवारांनी धर्मरावबाबा आत्राम यांना उमेदवारी दिली असून शरद पवार गटाकडून त्यांची मुलगी भाग्यश्री आत्राम यांना तिकीट देण्यात आले आहे.
 
मागील महिन्यात धर्मरावबाबा आत्राम यांच्या कन्या भाग्यश्री आत्राम यांनी आपल्याच वडिलांवर टीका करत शरद पवार गटात प्रवेश केला होता. त्यावेळीच भाग्यश्री आत्राम यांना शरद पवार गटाकडून अहेरी विधानसभेचे तिकीट मिळण्याची शक्यता वर्तवण्यात आली होती.
 
हे वाचलंत का? -  शरद पवार गटाची पहिली यादी जाहीर!
 
त्यानंतर आता शरद पवार गटाने नुकतीच आपली पहिली यादी जाहीर केली असून भाग्यश्री आत्राम यांना अहेरीतून संधी दिली आहे. त्यामुळे अहेरीत यंदा बापलेकीतच सामना रंगणार आहे. यात कोण बाजी मारणार? हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.