भाजप नेते राजकुमार बडोले यांचा राष्ट्रवादीत प्रवेश!

    22-Oct-2024
Total Views |
 
Rajkumar Badole
 
मुंबई : भाजप नेते आणि माजी मंत्री राजकुमार बडोले यांनी मंगळवारी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जाहीर प्रवेश केला. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत हा पक्षप्रवेश पार पडला. यावेळी राष्ट्रीय कार्याध्यक्ष खासदार प्रफुल पटेल, प्रदेशाध्यक्ष खासदार सुनिल तटकरे, पक्षाचे कोषाध्यक्ष आमदार शिवाजीराव गर्जे, प्रदेश प्रवक्ते संजय तटकरे आदी उपस्थित होते.
 
"राजकुमार बडोलेंसारखा एक अनुभवी आणि जनसामान्यांसाठी आवाज उठवणारा नेता पक्षात सामील झाल्याने पक्षाची ताकद नक्कीच वाढली आहे, याचा आम्हाला आनंद आहे. त्यांचं मी मनापासून स्वागत करतो आणि पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देतो," अशी प्रतिक्रिया यावेळी अजित पवारांनी दिली.
 
हे वाचलंत का? -  संदीप नाईक शरद पवार गटात दाखल!
 
राजकुमार बडोले हे अर्जुनी-मोरगाव विधानसभा मतदारसंघातून दोनदा निवडून आलेत. तसेच गोंदिया विधानसभा क्षेत्रात त्यांचा मोठा प्रभाव असल्याचं मानलं जातं. दरम्यान, आता ते राष्ट्रवादी काँग्रेसच्या तिकीटावर विधानसभा लढणार का? याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.