दोन पेक्षा जास्त मुलांना जन्म द्या! चंद्राबाबूंनी का केलं असं आवाहन?
21-Oct-2024
Total Views |
अमरावती:(Chandrababu Naidu) आंध्रप्रदेश मधील वृद्धांच्या वाढत्या लोकसंख्येवर चिंता व्यक्त करत, मुख्यमंत्री एन चंद्राबाबू नायडू म्हणाले की, राज्यातल्या प्रजनन दरात वाढ व्हायला हवी. प्रत्येकाने दोन किंवा त्यापेक्षा अधिक मुलं जन्माला घालायला हवी. शनिवारी अमरावतीमध्ये एका कार्यक्रमात बोलताना मुख्यमंत्र्यांनी हे वक्तव्यं केले ज्यावर आता बरीच चर्चा सुरु आहे.
आपल्या भाषणात नायडू म्हणाले की, राज्याचा प्रजनान दरात वाढ व्हायाला हवी, या संदर्भात सगळ्यांनीच विचार करायची वेळ आली आहे. या पूर्वी आपण लोकसंख्या नियंत्रणाचा विचार केला होता पण आता लोकसंख्या वाढीचा विचार करायाला हवा. राज्य सरकार लवकरच दोन किंवा त्यापेक्षा जास्त मुले असलेल्या लोकांनाच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लढवता येतील असा कायदा करणार आहे.
नायडू यांच्या विधानामागे तरुणांची घटत जाणारी लोकसंख्या आणि त्यायोगे कौशल्यबळाची निर्माण होणारी कमतरता याचा विचार आहे. त्यासोबत, सीमांकन म्हणजे Delimiation या बद्दल त्यांनी चिंता व्यक्त केली आहे, पुढील जनगणनेत जेव्हा लोकसंख्येच्या आधारावर लोकसभेच्या जागांचे पुनर्वाटप होईल. तेव्हा आंध्रप्रदेशला या गोष्टीचा फटका बसायाला नको. यानंतर त्यांनी युवकांच्या स्थलांतरावर सुद्धा चिंता व्यक्त केली आहे. नायडू म्हणाले की, आज अनेक गावांमधली तरुण मुलं मुली शहारात स्थलांतरित होत आहे, आणि वयोवृद्ध माणसे मात्र गावातच राहत आहेत.
नायडू यांनी दक्षिणेकडील राज्यातील घटत्या प्रजनन दराचाही उल्लेख केला जो १.६ वर घसरला आहे जो २.१ या राष्ट्रीय सरासरीपेक्षा खूपच कमी आहे. त्यांनी या घसरणीच्या परिणामांबद्दल चिंता व्यक्त केली असून असा इशारा दिला आहे की जर हा कल असाच चालू राहिला तर आंध्र प्रदेशला २०४७ पर्यंत वृद्धत्वाची गंभीर समस्या भेडसावू शकते.