केंद्राकडून रिझर्व्ह बँकेच्या पतधोरण समितीची पुनर्रचना; पुढील आठवड्यात बैठक होणार!
02-Oct-2024
Total Views |
मुंबई : केंद्रीय मंत्रिमंडळाने रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया(आरबीआय)च्या पतधोरण समितीची पुनर्रचना केली आहे. आरबीआयच्या
कायद्यानुसार, १९३४ (कलम 45ZB)द्वारे पतधोरण समितीत केंद्र सरकारद्वारे नियुक्त तीन सदस्य असे एकूण सहा सदस्य असतात. केंद्रीय मंत्रिमंडळाने तीन नवीन बाह्य सदस्यांच्या नियुक्तीची घोषणा केली असून नव्या सदस्यांसह आरबीआयच्या पतधोरण समितीची बैठक येत्या दि. ०७ ऑक्टोबरला होणार आहे. केंद्राने नियुक्त केलेले सदस्य चार वर्षांच्या कालावधीसाठी पदावर राहतील.
दरम्यान, सरकारने नियुक्त केलेल्या विद्यमान तीन सदस्यांची मुदत नियोजित एमपीसी बैठकीपूर्वीच संपणार आहे. त्यानुसार आगामी बैठकीत नवीन नियुक्त तीन सदस्यांचा समावेश केला जाणार असून यात दिल्ली स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स, दिल्ली विद्यापीठाचे संचालक, प्रा. राम सिंग तसेच इन्स्टिट्यूट फॉर स्टडीज इन इंडस्ट्रियल डेव्हलपमेंटचे संचालक डॉ. नागेश कुमार व अर्थतज्ज्ञ सौगता भट्टाचार्य यांच्या नियुक्तीला केंद्राने मान्यता दिली आहे.
केंद्राने पुनर्रचना केलेली पतधोरण समिती पुढीलप्रमाणे :-
भारतीय रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर - पदसिद्ध अध्यक्ष
भारतीय रिझर्व्ह बँकेचे डेप्युटी गव्हर्नर, पत विषयक धोरणाचे प्रभारी - पदसिद्ध सदस्य
भारतीय रिझर्व्ह बँकेचा एक अधिकारी (केंद्रीय मंत्रिमंडळाद्वारे नामनिर्देशित) - पदसिद्ध सदस्य
प्रा. राम सिंग, संचालक, दिल्ली स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स, दिल्ली विद्यापीठ - सदस्य
सौगता भट्टाचार्य, अर्थतज्ज्ञ - सदस्य
डॉ. नागेश कुमार, संचालक, इन्स्टिट्यूट फॉर स्टडीज इन इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट, नवी दिल्ली - सदस्य