धक्कादायक! गुंगीचं औषध देऊन विद्यार्थिनीवर शिक्षकाकडून अत्याचार; आरोपी युवक काँग्रेसचा शहराध्यक्ष

    02-Oct-2024
Total Views |
 
Child Rape
 
चंद्रपूर : चंद्रपूरमधून एक धक्कादायक बातमी पुढे आली आहे. इथे एका शिक्षकाने विद्यार्थिनीला गुंगीचे औषध देऊन तिच्यावर अत्याचार केला आहे. मुख्य म्हणजे आरोपी शिक्षक अमोल लोडे हा युवक काँग्रेसचा शहराध्यक्ष असल्याचेही सांगण्यात येत आहे. दरम्यान, आरोपीला पोलिसांकडून अटक करण्यात आली आहे.
 
चंद्रपूर जिल्ह्यातील कोरपना येथील एका नामांकित शाळेत ११ वर्षीय विद्यार्थीनीवर शिक्षकाने लैंगिक अत्याचार केला. पीडित मुलगी शाळेत क्लासेसकरिता गेली असता एक दिवस आरोपी शिक्षकाने तिला आपल्या कार्यालयात बोलवून घेतलं. त्यानंतर त्याने तिला गुंगीचे औषध दिले आणि तिच्यावर अत्याचार केला. तसेच या घटनेबद्दल कुणाला न सांगण्याची धमकीही दिली. त्यामुळे पीडिता घाबरली आणि तिने कुणाकडेही या घटनेची वाच्यता केली नाही.
 
हे वाचलंत का? -  "...म्हणून शिंदे साहेबांना आपली भूमिका घ्यावी लागली!" नितेश राणेंचं संजय राऊतांना प्रत्युत्तर
 
परंतू, आता तिच्या पालकांना या घटनेची माहिती मिळताच त्यांनी आरोपीविरुद्ध पोलिसात तक्रार दाखल केली. अमोल लोडे असं आरोपी शिक्षकाचं नाव असून तो युवक काँग्रेसचा शहराध्यक्ष आहे. पोलिसांनी अमोल लोडेविरुद्ध पॉक्सो अंतर्गत गुन्हा दाखल केला असून त्याला अकोल्यातून अटक करण्यात आली आहे.