'तरुण चेहऱ्यांनी राजकारणात यायला हवं' : विक्रांत पाटील

युवा आमदार विक्रांत पाटील यांचे तरुणांना आवाहन

    18-Oct-2024
Total Views |

MLC vikrant patil



नुकतीच महाराष्ट्र विधानपरिषदेच्या राज्यपाल नियुक्त आमदारांचा शपथविधी सोहळा संपन्न झाला. त्यापैकीच पहिल्यांदाच आमदार झालेले भाजपचे युवा आमदार विक्रांत पाटील यांचा युवा कार्यकर्ता ते विधानपरिषद आमदार असा प्रवास सांगणारा हा संवाद...

  • युवा मोर्चा अध्यक्ष ते आमदार हा प्रवास नेमका कसा होता?


कार्यकर्ता ते हा बहुमान असा हा प्रवास आहे. युवा मोर्चाचा अध्यक्ष हाच माझ्यासाठी मोठा बहुमान होता. कार्यकर्ता ते युवा मोर्चा अध्यक्ष असा एक टप्पा आणि आता युवा मोर्चा अध्यक्ष ते आमदार असा दोन टप्प्यात हा प्रवास झाला आहे. वयाच्या १६ वर्षापसून कमला सुरुवात झाली. युवा विद्यार्थ्यांचे प्रश्न त्यांचा संघर्षला आवाज असला पाहिजे हे मानणारा मी कार्यकर्ता आहे. मंडळ स्तरावर, जिल्हा युवा, तालुका युवा अशी सर्व काम करत २०१०ला मी युवामोर्चाचा सचिव झालो. अनेक दिग्गज मंडळी तेव्हा टीममध्ये होती जी नंतर मंत्री म्हणून समोर आली. २०१० ते २०१३पर्यंत मी सचिव होतो. पंकजा ताई आणि योगेश टिळेकर हे अध्यक्ष असतानाही मी चार वर्षे महासचिव म्हणून काम केले. २०२०मी युवामोर्चाचा अध्यक्ष झालो. कालांतराने, उद्धव ठाकरे यांचे सरकार आले. जनता भ्रष्टाचाराच्या त्रासाने पिचली होती, कोरोनाकाळात मिस मॅनेजमेंट आणि गोंधळ सुरू होता. याकाळात जनतेचा आवाज होत युवा मोर्चाला रस्त्यावर ठेवण्याचे काम आम्ही केले. त्याकाळात आम्ही सातत्याने विविध विषयांवर आवाज उठवला. युवा आवाज विधानभवनात असला पाहिजे हे पाहता विक्रांत पाटील सारख्या युवकाला संधी दिली पाहिजे. देवेन्द्रजी म्हणजे कायम युवकांच्या पाठीशी असणार नेतृत्व, युवकांसाठी व्हिजनरी असं नेतृत्व आहे. आमच्या सगळ्याच नेत्यांचे मी यानिमित्ताने आभार मानेल.


  • युवकांचा आवाज आहात तुम्ही, आमदार म्हणून तुमच्या रडारवर असणारे मुद्दे कोणते?


सत्ता आल्यावर सरकराने युवकांसाठी जे काही केलं त्या सरकारमधील आणि युवकांमधील दुवा होण्याचे काम आम्ही केले. तर विरोधात असताना युवकांच्या प्रश्नांना वाचा फोडली. त्यामुळे दोन्ही भूमिकेत आम्ही काम केले आहे. फरक एवढाच आहे की, यापूर्वी हे सर्व सभागृहाबाहेर आम्ही करत होतो. आता नेतृत्वाच्या आणि देवाच्या कृपेने हे विषय आम्हाला सभागृहापुढे मांडता येतील. पॉलिसी मेकिंगमध्ये यापूढे युवकांना स्थान असेल त्यांच्या हिताचे असेल हे आक्रमकपणे सांगण्यासाठी आम्ही कटिबद्ध असणार अशी खात्री मी देतो. विकसित राष्ट्राच्या निर्मितीत विकसित महाराष्ट्र घडविण्यासाठी युवांचा सहभाग लागणार आहे. युवकांना जोडण्याचे काम आम्ही करू.


  • लोकसभा निवडणुकींनंतर भाजप किंवा महायुती अपयशी ठरल्याचे चित्र निर्माण करण्यात आलं. आगामी विधानसभेत हे चित्र खोडून काढण्यासाठी आपण काय करत आहोत?


लोकसभेला जे झालं ते वाईट होतं. खेळाचे नियम असतात ते सोडून जेव्हा काही होतं तेव्हा ते वाईट असतं. देवेंद्र फडणवीस साहेबानी एक सांगितलं की महाविकास आघाडी सरकारची तीन मंडळी जी लबाड मंडळी आहेत. आम्ही जे यशापासून थोडेफार लांब राहिलो ते या लबाड मंडळींमुळे नाही राहिलो. यांच्या बरोबरीने एक आभासी निर्मितीचा आणि फेक नॅरेटिव्हचा चौथा घटक होता. नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण करण्यात आले. संविधान रद्द होणार, आदिवासी बांधवाना आरक्षण रद्द होणार असा फेक नरेटिव्ह होता. मात्र आता जनतेला सर्व कळलं आहे. जनतेला आता वास्तव कळलं आहे. जनतेच्या मनात एक खंत आहे. मात्र, आगामी लोकशाहीच्या उत्सवात सहभागी होतं जनता आता त्यांचा कौल देणार आहे. जनतेला सुपर पॉवर महाराष्ट्र बनविणार सरकार हवं आहे. जनतेला विश्वास आहे की, ही धमक महायुती सरकारमध्येच आहे.

  • नवी मुंबईच्या विकासाला गती मिळतेय. आंतरराष्ट्रीय हब म्हणून नवी मुंबई आकाराला येईल, असे वाटते का?

मुंबई महाराष्ट्राची आर्थिक राजधानी आहे. आता मुंबईची भौगोलिक स्थिती पाहता लोकसंख्येच्या विस्तारासाठी मुंबई स्थरावर मर्यादा आल्या आहेत. म्हणूनच आता नवी मुंबई, रायगड याकडे मुंबईचा विस्तार होतो आहे. राज्य सरकारचे व्हिजन पहिले असता सद्यस्थतीत मोठी विकासकामे याभागात सुरु आहेत. त्याच आणखी एक कारण आहे की, नवी मुंबई आणि रायगडला महाराष्ट्राच्या सर्वच भागांचा उत्तम ऍक्सेस आहे. जेव्हा एक आंतराष्ट्रीय विमानतळ येत तेव्हा त्याला पूरक इतर व्यवस्था तिथे येतात. सिडको सारखे मोठे प्राधिकरन तिथे कार्यरत आहे. अनेक युवक युवतींना यामुळे ताकद मिळते. जेएनपीटी सारखं मोठं बंदर इथे आहे. पुढील पाच वर्षात मोठे बदल दिसतील. पनवेल आणि नवी मुंबई महानगरपालिका चांगल्यारितीने काम करते आहे, मात्र आणखी पायाभूत सुविधा होण्यावर आम्हाला लक्ष द्यावं लागणार आहे.


  • पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी १५ ऑगस्टच्या भाषणात तरुणांनी राजकारण , समाजकारणात सहभाग वाढवावा असं आवाहन केलं. युवा आमदार म्हणून तरुणांना काय आवाहन कराल?

आपल्याला आपला देश, राष्ट्र घडवायचं असेल तर या प्रक्रियेच्या बाहेर राहून आपण फक्त टीका, टिप्पणी करत राहिलो मात्र सहभागी झालो नाहीतर आपल्याला टीका करण्याचा अधिकार राहत नाही. युवकांना व्हिजन असेल, युवक तितक्या ताकदीचे आहेत, १० वर्षानंतरच त्यांना अंदाज बांधता येतो असे युवक प्रक्रियेत आले तरच आपण एक सशक्त भारत नि राज्य घडवू शकतो. राज्यभरात फिरताना दुर्दैवाने तरुणांकडून एक ऐकायला मिळत की मला काय त्याच? म्हणजेच एखादी घटना आपल्या परिवार आणि जवळच्या व्यक्तीबाबत घडत नाही, तोपर्यंत त्याच गांभीर्य आपल्याला येत नाही. ही भावना घातक आहे. राष्ट्रनिमितीमध्ये आपल्या भारत मातेला परम वैभवावर घेऊन जायचं असेल, २०४७चा सुपर पॉवर भारत घडविण्यासाठी युवकांचा सहभाग आवश्यक आहे. आपण कोणत्या विचारधारेत जावं, पक्ष कोणता असावा यांची निवड त्या तरुणाची असेल मात्र या तरुणांनी राजकारणात, समाजकारणात यावं. राजकारण वाईट आहे म्हणतात मात्र राजकारण काय आहे हे कोणाला समजूनच घ्यायचे नाही. मी म्हणेल की, ग्रामपंचायत पातळीपासून देशाच्या पार्लिमेंटपर्यंत तरुणांनी राजकारणात यायला हवं. तेव्हाच आपण तरुणांचा देश ही ओळख अजून ताकदीने समोर आणू शकतो.