'या' दिवशी जाहीर होणार मविआचं जागावाटप! विजय वडेट्टीवारांची माहिती

    17-Oct-2024
Total Views |
 
Wadettivar
 
मुंबई : विधानसभा निवडणूकीच्या जागावाटपासंदर्भात महाविकास आघाडीच्या बैठकांचं सत्र सुरु आहे. दरम्यान, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी जागावाटपावर भाष्य केलं. गुरुवारी महाविकास आघाडीची अंतिम बैठक आयोजित करण्यात आली असून उद्या किंवा परवा जागावाटप जाहीर होण्याची शक्यता असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
 
विजय वडेट्टीवार म्हणाले की, "२१६ जागांवर आमची चर्चा झाली असून ६६ जागांवर आज चर्चा होणार आहे. तसेच आजच्या चर्चेनंतर अंतिम निर्णय होण्याची शक्यता आहे. आज किंवा उद्या सकाळी पत्रकार परिषद घेऊन जागावाटप जाहीर करण्याची आमची तयारी आहे," असे त्यांनी सांगितले.
 
हे वाचलंत का? -  मविआची अंतर्गत फोडाफोडी! उबाठात असलेला काँग्रेसचा जुना नेता घरवापसी करणार?
 
"तसेच २० ऑक्टोबर रोजी संध्याकाळी काँग्रेसची पहिली यादी येण्याची शक्यता आहे. आजच्या बैठकीत सर्व जागांवर तोडगा निघाल्यास २० तारखेला अंतिम यादीसुद्धा येऊ शकते. आमची सर्वसमावेशक भूमिका असून आम्ही जिंकण्याचा निर्धार केला आहे. महाविकास आघाडी राज्यातील प्रत्येकी ८ विभागात किमान ३ सभांचे नियोजन आम्ही केले आहे. समाजवादी पक्षासोबत आमची चर्चा झाली असून त्यांना काही जागा देण्याचा आम्ही निर्णय घेतला आहे," अशीही माहिती वडेट्टीवारांनी दिली.