मविआची अंतर्गत फोडाफोडी! उबाठात असलेला काँग्रेसचा जुना नेता घरवापसी करणार?

    17-Oct-2024
Total Views |

Thackeray & Patole
 
मुंबई : विधानसभेसाठी महाविकास आघाडीचं जागावाटप सुरु आहे. मविआमध्ये अशातच उमेदवारांची सेटलमेंट करण्यात येत आहे. उबाठा गटाच्या नेत्या निर्मला गावित या काँग्रेसमध्ये घरवापसी करणार असल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात रंगल्या आहेत.
 
दोन दिवसांपूर्वी काँग्रेसचे विद्यमान आमदार हिरामण खोसकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. त्यामुळे इगतपुरी विधानसभेची जागा रिक्त झाली होती. दरम्यान, महाविकास आघाडीमध्ये इगतपुरीची जागा पुन्हा एकदा काँग्रेसकडे येण्याची शक्यता आहे. त्यासाठी निर्मला गावित या काँग्रेसमध्ये प्रवेश करणार असल्याची चर्चा आहे. निर्मला गावित यांना इगपुरीमध्ये काँग्रेसकडून उमेदवारी मिळण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
 
हे वाचलंत का? - मोठी बातमी! अधिकारी समीर वानखेडे विधानसभेच्या रिंगणात?
 
निर्मला गावित या काँग्रेसच्या जुन्या नेत्या आहेत. २०१९ मध्ये त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला होता. शिवसेनेतील फुटीनंतर त्यांनी उद्धव ठाकरेंना पाठींबा दिला. त्यानंतर आता विधानसभा निवडणूकीच्या तोंडावर त्या पुन्हा एकदा काँग्रेमध्ये घरवापसी करण्याची शक्यता आहे.