SNDT महिला विद्यापीठाच्या बल्लारपूर आवारातील विद्यार्थिनींसाठी ४४ आसनी बसचे लोकार्पण!

मंत्री सुधीर मुनगंटीवारांच्या हस्ते लोकार्पण संपन्न

    14-Oct-2024
Total Views |
 
Mungantivar
 
चंद्रपूर : बल्लारपूर येथील SNDT महिला विद्यापीठ मुंबईच्या महर्षी कर्वे महिला सक्षमीकरण ज्ञानसंकुल येथील विद्यार्थिनींकरिता ४४ आसनी बसचे लोकार्पण करण्यात आले. पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या प्रमुख उपस्थितीत हा लोकार्पण सोहळा पार पडला.
 
पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या विशेष प्रयत्नाने वनविकास महामंडळ (FDCM) च्या सीएसआर निधी अंतर्गत बस खरेदीसाठी ३६.८० लक्ष रुपये मंजूर करण्यात आले होते. या सीएसआर निधी अंतर्गत प्राप्त ३६.८० लक्ष रुपयांमधून एसएनडीटी महिला विद्यापीठाच्या बल्लारपूर आवाराने एक ४४ आसनी टाटा अल्ट्रा बस खरेदी केली. सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते बल्लारपूर येथे या बसचे लोकार्पण संपन्न झाले.
 
हे वाचलंत का? -  "उद्धव ठाकरे, महाराष्ट्रातील जनता तुम्हाला माफ करणार नाही!"
 
यावेळी विद्यापीठाच्या बल्लारपूर आवाराचे संचालक डॉ. राजेश इंगोले, सहायक कुलसचिव डॉ. बाळू राठोड, एफडीसीएम चंद्रपूरचे विभागीय व्यवस्थापक सुमित कुमार, हरीश शर्मा आणि वेदानंद अल्मस्त समन्वयक प्रकाश धारणे उपस्थित होते. विद्यापीठाच्या बल्लारपूर आवारातील सर्व शिक्षक, अधिकारी-कर्मचारी आणि विद्यार्थिनीसुद्धा उपस्थित होत्या.
 

Mungantivar 
 
या बसमुळे बल्लारपूर-चंद्रपूरच्या आसपासच्या ग्रामीण भागातील विद्यार्थिनींच्या प्रवासाची सोय होणार आहे. एसएनडीटी महिला विद्यापीठाच्या कुलगुरू डॉ. उज्वला चक्रदेव यांनी मंत्री सुधीर मुनगंटीवार आणि एफडीसीएमचे व्यवस्थापकीय संचालक संजीव गौड यांचे बस उपलब्ध करून दिल्याबद्दल आभार व्यक्त केले.