दुर्गा देवीच्या विसर्जन मिरवणुकीत कट्टरपंथीयांकडून दगडफेक

    13-Oct-2024
Total Views |

Durga Devi Visarjan
 
लखनऊ : उत्तर प्रदेशातील गोंडा जिल्ह्यातील दुर्गा मातेच्या विसर्जन मिरवणुकीत काही कट्टरपंथीयांनी दगडफेक केली असल्याची धक्कादायक घटना आहे. यावेळी समाजकंटकांनी समाजात तेढ निर्माण होतील अशा घोषणाबाजी केली आहे. यावेळी अतिरिक्त पोलीस ताफा घटनास्थळी पोहोचला होता. यावेळी वाद निर्माण झाल्यानंतर पोलिसांनी वाद शमवण्याचा प्रयत्न केला होता. यावेळी दगडफोक करणाऱ्या व्यक्तीचा शोध सुरू असून ही घटना १२ ऑक्टोंबर रोजी घडली आहे.
 
प्रसारमाध्यमाने ही घटना १२ ऑक्टोबर रोजी गोंडा नगर येथील कोतवाली पोलीस ठाणे परिसरात ही घटना घडली, येथे शनिवारी सायंकाळी सातवच्या सुमारास दुर्गामातेच्या मूर्तीवर दगडफेक करण्यात आली होती. मिरवणुकीत शेकडो भाविक उपस्थित होते. मिरवणुकीच्या वाटेवर आम्हाला घोसियाना येथे थांबावे लागले असून हा कट्टरपंथींचा परिसर असल्याची माहिती आहे. यामुळे काही काळ गोंधळाचे वातावरण निर्माण झाले.
 
 
यावेळी घटनास्थळी पोलीसांनी धाव घेत सुरू असलेला गोंधळ शांत करण्याचा प्रयत्न केला. वरिष्ठ अधिकाऱ्यांसह अतिरिक्त पोलीस बंदोबस्त परिसरात पाठवण्यात आला, त्यामुळे काही काळ गोंधळानंतर परिस्थिती पूर्वपदावर आली. त्यानंतर कडेकोट पोलीस बंदोबस्तात मूर्तीचे विसर्जन करण्यात आले.