एलआयसीचा रेकॉर्ड मोडणार; ह्युंदाई मोटर्सचा २८ हजार कोटींचा आयपीओ येणार

    12-Oct-2024
Total Views |
hyundai-ipo-company-will-spend

 
मुंबई :      देशातील आतापर्यंतचा सर्वात मोठा आयपीओ लवकरच बाजारात येणार आहे. ह्युंदाई मोटर्स इंडिया लिमिटेड इश्यू लाँच होण्यासाठी फक्त दोन दिवस उरले आहेत. दि. १५ ऑक्टोबर ते १७ ऑक्टोबर २०२४ पर्यंत आयपीओकरिता अप्लाय करता येणार आहे. ह्युंदाई मोटर्सने आयपीओसाठी १,८६५-१,९६० रुपये प्राईस बँड निश्चित केला आहे.


हे वाचलंत का? -     रिलायन्स डिजिटलच्या फेस्टिवल ऑफ इलेक्ट्रॉनिक्समुळे भारतात जोरात उत्सव साजरा होणार!
 

दरम्यान, ह्युंदाई मोटर्स या आयपीओच्या माध्यमातून एलआयसीचा रेकॉर्ड मोडण्याची शक्यता आहे. एलआयसीच्या २१ हजार कोटी रुपयांच्या आयपीओचा इतिहास लवकरच मोडला जाणार आहे. ह्युंदाई मोटर्स आयपीओचा एक लॉट ७ शेअर्सचा असणार आहे. आयपीओच्या माध्यमातून २७,८७०.१६ कोटी रुपये भांडवल उभारणार आहे.

कंपनी आयपीओच्या माध्यमातून उभारलेल्या भांडवलातून उत्पादन क्षमता वाढविण्याची योजना आखत आहे. सद्यस्थितीस कंपनीने चेन्नई, तामिळनाडू येथील बॅटरी असेंब्ली प्लांटमध्येही गुंतवणूक केली आहे. ज्याची क्षमता २०२५ पर्यंत पहिल्या टप्प्यात वार्षिक सुमारे ७५ हजार बॅटरी पॅकची असेल. २०२४ मध्ये Hyundai मोटर कंपनी आणि Kia कॉर्पोरेशनने आगामी इलेक्ट्रिक वाहनांसाठी बॅटरी स्थानिकीकरणाच्या प्रयत्नांना मदत करण्यासाठी धोरणात्मक सहकार्यासाठी एक्साईड एनर्जी सोल्यूशन सोबत करार केला आहे.