विस्तारवाद नव्हे, विकासावादानेच प्रश्न सुटतील

पंतप्रधान मोदी यांचे प्रतिपादन

    11-Oct-2024
Total Views |

modi eas
 
 
व्हिएन्टिन : "मी बुद्धांच्या भूमितून आलो आहे. आम्ही सातत्याने सांगतो की ही वेळ युद्ध करण्याची नाही. जागतिक समस्यांवरची उत्तरं युद्धभूमीवर मिळत नाही." असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी १९व्या पूर्व आशिया शिखर परिषदेत केले. लाओस येथील व्हिएन्टिन या शहरात ते शुक्रवारी बोलत होते. सध्या पंतप्रधान, परिषदेनिमित्त लाओस येथे दोन दिवसांच्या दौऱ्यावर असून या दरम्यान अनेक आंतरराष्ट्रीय नेत्यांची भेट ते घेणार आहेत.

परिषदेत आपल्या भाषणादरम्यान मोदी म्हणाले की जगाच्या पाठीवर आज वेगवेगळ्या ठिकाणी संघर्ष सुरु आहे. याचा सर्वाधिक फटका आशियातील दक्षिणेतल्या देशांना बसतो आहे. त्यामुळे आंतरराष्ट्रीय कायद्यांचे पालन करणे हे सगळ्यांच्याच हिताचे आहे. याच सोबत, इंडो पॅसिफिक हा प्रदेश सर्वसमावेशक आणि तणावमुक्त राहील या बद्दल आपण प्रयत्नशील असले पाहीजे. असे म्हणत चीनला इशारा दिला आहे. विकासावादावर भाष्य करत, मोदी म्हणाले संयुक्त राष्ट्रांच्या समुद्राच्या कायद्याचे पालन देशांनी करायाला हवे जेणेकरुन, सर्व देशांचे स्वातंत्र्य अबाधित राहील. आपण विस्तारवादाऐवजी विकासावादावर भर दिला पाहिजे, यातच जगाचे हीत आहे.

दहशतवादावर काय म्हणाले मोदी?
जागतिक शांततेसाठी आणि सुरक्षतितेसाठी दहशतवादाचा मुकाबाला करणे गरजेचे आहे असे मत मोदी यांनी व्यक्त केले. दहशतवादाच्या आव्हानाला कमी लेखुन चालणार नाही. मानवतेच्या रक्षणासाठी सगळ्यांनी एकत्र येऊन दहशतवादाशी दोन हात करणे गरजेचे आहे. सायबर क्षेत्र, सागरी आणि अवकाश क्षेत्रात एकमेकांना सोबत करत, साम्यर्थ वाढवणे गरजेचे आहे. मानवतावादी दृष्टीकोन ठेवत, संवाद साधून समस्या सोडवणे गरजेचे आहे. विश्वबंधुत्वाची कास धरत, भारत आपल्या परीने यामध्ये सहभाग नोंदवत राहील अशी ग्वाही मोदी यांनी दिली.

आपल्या भाषणात मोदी यांनी "यागी" चक्रीवादळामुळे नुकसान झालेल्या लोकांच्या प्रति खेद व्यक्त केला. या कठीण प्रसंगी, भारताने ऑपरेशन सद्भावच्या माध्यमातून मदतीचा हात पुढे केला आहे. २०२४ साली भारताच्या "अॅक्ट ईस्ट" धोरणाला १० वर्ष पूर्ण झाली असून, व्यापार आणि गुंतवणूक या पासून ते अगदी सुरक्षा यंत्रणा, वारसा संवर्धन, या क्षेत्रात भारतासोबत दक्षिण आशियातील देशांनी सहयोग वाढवला आहे.