मुंबई : युनिफाईड पेमेंट इंटरफेस(युपीआय)चा वापर डिजिटल पेमेंटसाठी सर्वाधिक होताना दिसून येत आहे. देशात सर्व व्यवहारांसाठी डिजिटल पेमेंटला प्राधान्य दिले जात असून सप्टेंबर महिन्यात दररोज ५०.१ कोटींहून अधिक व्यवहार झाल्याचे समोर आले आहे. डिजिटल व्यवहारांसाठी युपीआयचा वापर दिवसेंदिवस वाढताना दिसून येत आहे.
दरम्यान, सप्टेंबर महिन्यात तब्बल ६८,८०० कोटी रुपयांचा डिजिटल व्यवहार झाला. तसेच, ऑगस्टमध्ये एकूण १४९६ कोटींचे व्यवहार झाले असून सप्टेंबर महिुन्यात केवळ ०.५ टक्के इतकी वाढ झाली आहे. परिणामी, एप्रिल २०१६ मध्ये युपीआय लाँच झाल्यापासून सप्टेंबर महिन्यातील व्यवहारांची संख्या सर्वाधिक संख्या असून दैनंदिन व्यवहारांची संख्या ऑगस्टमध्ये ४८.३ कोटी रुपये रुपये होती.
मूल्याच्या बाबतीत, सप्टेंबरमध्ये व्यवहार जवळजवळ स्थिर राहत २०.६४ लाख कोटी रुपये राहिले. ऑगस्टमध्ये युपीआय व्यवहार २०.६१ लाख कोटी रुपयांचे होते. जुलैमध्ये युपीआय व्यवहारांची संख्या १४४४ कोटी आणि मूल्य २०.६४ लाख कोटी रुपये इतके होते. ताज्या आकडेवारीनुसार, युपीआय व्यवहाराने मागील महिन्यात ५० कोटी दैनंदिन व्यवहारांचा आकडा पार केला.
तात्काळ पेमेंट सर्व्हिस व्यवहाराचे प्रमाण सप्टेंबरमध्ये ५ टक्क्यांनी घटून ४३ कोटींवर आले. मूल्याच्या दृष्टीने, व्यवहार ऑगस्टमध्ये ५.५८ लाख कोटी रुपयांवरून २ टक्क्यांनी घसरून ५.६५ लाख कोटी रुपयांवर आले आहेत. जुलैमध्ये ते ४९ कोटी आणि ५.७८ लाख कोटी रुपये होते. गेल्या वर्षीच्या तुलनेत, तात्काळ पेमेंट सर्व्हिस व्यवहारांमध्ये ९ टक्क्यांनी घट झाली.