'बँक ऑफ बडोदा'तर्फे ‘स्वच्छता ही सेवा’ २०२४ उपक्रम; बीएमसी कर्मचाऱ्यांचा सत्कार
बँकेच्या २२ झोनल ऑफिसमधील कर्मचाऱ्यांचा सहभाग
01-Oct-2024
Total Views |
मुंबई : भारत सरकारने जाहीर केलेल्या ‘स्वच्छता ही सेवा’ २०२४ उपक्रमांतर्गत बँक ऑफ बडोदातर्फे देशभरात स्वच्छता मोहिमेचे आयोजन करण्यात आले. या उपक्रमाच्या माध्यमातून कचरा साफ करणे, सफाई कर्मचाऱ्यांच्या योगदानाची दखल व त्यांच्यासाठी आरोग्य शिबिराचे आयोजन यांचा समावेश आहे. ‘संपूर्ण स्वच्छता श्रमदानातून’ या ध्येयाप्रति बांधिलकी जपण्यासाठी बँकेने देशभरात स्वच्छता मोहिमेचे आयोजन केले.
दरम्यान, या उपक्रमाद्वारे स्वच्छता चालना देण्याचे ध्येय ठेवण्यात आले असून, अवघड आणि अस्वच्छ जागांचे रुपांतर करण्यावर - क्लीनलीनेस टार्गेट युनिट्स (सीटीयूज) भर देत स्वच्छ व हरित पर्यावरणाप्रति योगदान देण्याची बांधिलकी अधोरेखित करण्यात आली आहे. या देशव्यापी कॅम्पेनचा भाग म्हणून बँक ऑफ बरोडाने वृक्षारोपण सीरिज, वॉक अ थॉन, सफाई मित्रांसाठी आरोग्य आणि स्वास्थ्य शिबिर यांचे आयोजन केले.
या उपक्रमांतून सफाई मित्रांद्वारे बँकेच्या देशभरातील शाखा व कार्यालयांसाठी दिल्या जाणाऱ्या योगदानाची दखल घेतली जाणार आहे. ‘संपूर्ण स्वच्छता’ अभियानासाठी सफाई कर्मचारी देत असलेल्या योगदानाची दखल घेण्यासाठी बँकेने मुंबईतील घनकचरा व्यवस्थापन विभाग, बृहन्मुंबई म्युन्सिपल कॉर्पोरेशन (बीएमसी) येथील टीमचा सत्कार करण्यात आला.