केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांनी भाजप कार्यकर्त्यांना दिला विजयाचा कानमंत्र!

दादरमध्ये पार पडला संवाद मेळावा

    01-Oct-2024
Total Views |
 
Amit Shah
 
मुंबई : केंद्रीय गृहमंत्री अमित शाह हे सध्या मुंबई दौऱ्यावर असून मंगळवार, १ ऑक्टोबर रोजी दादर येथील योगी सभागृहात भाजप कार्यकर्त्यांचा संवाद मेळावा पार पडला. यावेळी अमित शाहांनी आपल्या कार्यकर्त्यांना विजयाचा कानमंत्र दिला आहे. या निवडणुकीत मतदानाची टक्केवारी वाढवा, विजय आपलाच होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
 
या बैठकीला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, मुंबई अध्यक्ष आशिष शेलार, भाजपचे महाराष्ट्र प्रदेश निवडणूक प्रभारी भूपेंद्र यादव, सहप्रभारी अश्विनी वैष्णव, राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे, राष्ट्रीय सह संघटन मंत्री शिवप्रकाश जी, व्ही. सतीश, कॅबिनेट मंत्री मंगल प्रभात लोढा, राज्याच्या निवडणूक व्यवस्थापन समितीचे प्रमुख रावसाहेब दानवे, राज्यातील भाजपचे सर्व खासदार, आमदार आणि प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.
 
हे वाचलंत का? -  "गेली १५-२० मुंबईत मेव्हेणे मेव्हणे मेव्हण्यांचे..."; केशव उपाध्येंचा संजय राऊतांवर घणाघात
 
"महाराष्ट्रात जिथे एकीकडे महाविकास आघाडी लांगूलचालनाच्या सर्व मर्यादा ओलांडण्याचा विक्रम रचत आहे, तिथेच मोदीजींच्या नेतृत्वाखालील राज्यातील एनडीए सरकार समाजाच्या सर्व स्तरांतील कल्याणासाठी नवे विक्रम रचत आहे," असे अमित शाह म्हणाले. तसेच यावेळी कार्यकर्त्यांनी केंद्र व राज्य सरकारच्या कार्याची माहिती घराघरात पोहोचवून ‘पुन्हा एकदा, एनडीए सरकार’ स्थापन करण्याचा संकल्प केला.