छत्रपती संभाजीनगर : राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाचे नेते जितेंद्र आव्हाडांनी प्रभु श्रीरामांबद्दल केलेल्या वादग्रस्त वक्तव्याचा राज्यभरात निषेध करण्यात येत आहे. अनेक ठिकाणी आव्हाडांविरोधात निदर्शनेही करण्यात येत आहे. यातच आता छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजप आक्रमक झाला असून आंदोलन सुरु केले आहे.
छत्रपती संभाजीनगर येथे जितेंद्र आव्हाड यांच्या फोटोला उलटं टांगून शेण फासण्यात आले आहे. तसेच आव्हाडांविरोधात घोषणाबाजीही करण्यात येत आहे. याशिवाय पुणे, मुंबई, नाशिकसह अनेक ठिकाणी जितेंद्र आव्हाडांच्या वक्तव्याचा निषेध करण्यात येत आहे. बुधवारी शिर्डी येथील पक्षाच्या मेळाव्यात आव्हाडांनी राम शाकाहारी नव्हता, मांसाहारी होता असे वादग्रस्त विधान केले होते. त्यामूळे हिंदूंच्या भावना दुखावल्या गेल्याने जितेंद्र आव्हाडांविरोधात महाराष्ट्रात निदर्शने केली जात आहेत.