मातोश्री सत्ताकेंद्र हे सुत्रं जपलं ते फक्त भाजपनेच!

    04-Jan-2024
Total Views |
Mahavikas Aghadi news

महाविकास आघाडीतील जागावाटपासंदर्भात काँग्रेसची वेगळी भूमिका असून त्यावर चर्चा करण्यासाठी उद्धव ठाकरे दिल्लीला जाणार असल्याची चर्चा सुरू झाली आहे. यावर पत्रकार परिषदेत प्रतिनिधींनी प्रश्न विचारला असता त्यावर संजय राऊतांनी भूमिका स्पष्ट केली आहे. काँग्रेसचे वरिष्ठ नेते आणि उद्धव ठाकरे यांच्यामध्ये चर्चा होत असते. दोघांमध्ये उत्तम संवाद आहे. जागा वाटपाच्या विषयात कुठलीही अडचण नाही. भविष्यात गरज पडली तर नक्कीच दिल्ली जाऊ, काँग्रेसचा जो काही विषय असेल तो आम्ही दिल्लीत जाऊन सोडवू असं विधान दि. २ जानेवारी रोजी ठाकरे गटाचे प्रवक्ते संजय राऊत यांनी केले. आणि त्यानंतर उबाठा गटातले नेते दिल्लीला जातात पण काँग्रेस- राष्ट्रवादीतील नेते मात्र कधी मातोश्रीला येत नाहीत? असा प्रश्न निर्माण झाला.

२०१७ च्या निवडणुकीत भाजपा -शिवसेनामध्ये महापौरपदी कोण बसणार? ह्या मुद्द्यावरून चर्चा सुरू होती. याउलट २०१२ च्या निवडणुकीच्या मानाने राष्ट्रवादी काँग्रेस आणि मनसे ह्यांच्या हातून बरेच वार्ड २०१७ च्या निवडणुकीत गेले होते. मात्र त्यावेळी भाजप सहज महापौरपदी बसू शकत होती. भाजपने मुंबईत भाजपचा महापौर बसविण्याची संधी असतानाही उद्धव ठाकरेंना दिलेल्या शब्दासाठी माघार घेण्यात आली. त्यावेळी मुंबई महापालिकेत भाजप विरोधी पक्षाची भूमिकेत राहणार नाही, तर पारदर्शकतेचे पहारेकरी म्हणून भूमिका भाजप निभावेल,अशी भूमिका तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मांडली होती. आता भाजपाच्या आणि देवेंद्र फडणवीसांच्या या निर्णयाने अनेकांना धक्का बसला होता. पण त्यावेळी मित्रपक्षांला सहकार्य करण्याची वृत्ती भाजपाने दाखवली होती.
 
त्यापूर्वी २०१६ मध्ये केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी आपल्या मुलीच्या लग्नाची पत्रिका देण्यासाठी हितसंबध दृढ करण्यासाठी खुद्द उद्दव ठाकरेंची मातोश्रीवर जाऊन भेट घेतली होती. त्याआधी शिवसेना खासदार जिल्हा बॅकांवरील निर्बांधाविरोधात केंद्रात गेले होते. त्यावेळी केंद्राने मवाळ भुमिका घेतल्यास भाजपविरोधात दंड थोपवण्याची तयारीही शिवसेनेने केली होती, अशी माहिती काही वृत्तसंस्थानी दिली होती. पण तरीदेखील मतभेद बाजूला ठेवून गडकरी मातोश्रीवर गेले होते.त्यानंतर २०१८ मध्ये केंद्रीय मंत्री अमित शाह यांनी ही उद्धव ठाकरेंची मातोश्रीवर जाऊन भेट घेतली होती. त्याआधी सुद्धा शिवसेनेच्या मुखपत्रातून पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शाह यांच्यावर टीका होत होती. तरीदेखील राजकीय मतभेद विसरुन दोन पक्षांमधील राजकीय कटूता दूर करण्यासाठी शाह स्वत: मातोश्रीवर आले होते. त्यावेळी तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ही शाहंसोबत होते.

 दरम्यान २०१९ मध्ये भाजप नेते आशिष शेलार यांनी ही मातोश्रीवर उद्धव ठाकरे, उद्योगमंत्री सुभाष देसाई, शिवसेना सचिव मिलिंद नार्वेकर यांची भेट घेतली होती. ही भेट राजकीय नसली तरी त्यावेळचं वातावरण पाहता ही भेट महत्त्वपुर्ण मानली जात होती. हा झाला शिवसेना -भाजपा युतीचा काळ ज्यामुळे भाजपा नेते, मंत्री मोठ्या मनाने मातोश्रीवर ठाकरेंची सदिच्छा भेट घेत असतं. इतकचं काय ठाकरेंचे स्वीय सहाय्यक असलेल्या मिलींद नार्वेकरांशीही देवेंद्र फडणवीसांसह भाजपच्या सर्वच नेत्यांनी सहृदय संबंध जपले होते. पण ठाकरेंच्या मनात मुख्यमंत्रीपदी बसवण्याची महत्वकांशा जागी झाली आणि ही मैत्री फोन न उचलेपर्यंतच्या स्तरावर जाऊन पोहोचली. ठाकरेंना नवे मित्र मिळाले खरे पण त्यांचं झालं काय तेही पाहूत.

२०१९ ला भाजपा-शिवसेना युती तुटली आणि उद्धव ठाकरेंनी काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत जात वेगळी चूल मांडली. त्यावेळची परिस्थिती फार वेगळी होती. त्यावेळी शिवसेनेसा पुरेस संख्याबळ मिळवून महाराष्ट्रात सत्तास्थापनेसाठी काँग्रेस -राष्ट्रवादीसोबत बैठकीसाठी मातोश्रीबाहेर पडावं लागलं. या बैठकीला ठाकरे कदाचित पाहिल्यांदाचं मातोश्रीबाहेर पडले असावेत, असा आरोप त्यांचे राजकीय विरोध करतात. ही बैठक झाली होती, नेहरु सेंटरमध्ये.त्यानंतर १३ नोव्हेंबर रोजी काँग्रेस नेत्यासोबत बोलणीसाठी उद्धव ठाकरे हॉटेल ट्रायडंट हॉटेलमध्ये गेले. या बैठकीत काँग्रेसकडून बाळासाहेब थोरात, अशोक चव्हाण, माणिकराव ठाकरे उपस्थित आहेत. तर शिवसेनेकडून स्वत: उद्धव ठाकरे आणि मिलिंद नार्वेकर होते. या बैठकीच्या दोन दिवस आधीचं शरद पवारांची ही ठाकरेंनी सिल्वहर ओकवर भेट घेतली होती. दरम्यान सिल्वहर ओकवर समन्वय ठेवण्यासाठी ठाकरे आणि राऊत पवारांना भेटल्याच्या चर्चा योग्य रितीने होतच असतात.

पण यासगळ्यात आश्चर्याची बाब म्हणजे ठाकरे गटाचे नेते वेळोवेळी काँग्रेस - राष्ट्रवादीच्या नेत्यांना भेटीसाठी त्यांच्या निवासस्थानी, कार्यक्षेत्रात जात. दरम्यान शरद पवार ही मातोश्रीवर जाणं टाळतात. उलट ठाकरेंनाच सिल्वहर ओकवर बोलवलं जातं. तसेच काँग्रेसचे नाना पटोले वगळता काँग्रेसमधील एकही मोठा नेता मातोश्रीवर राजकीय भेटीसाठी आलेला नाही. याउलट भाजप युतीसोबत असताना भाजपातील अनेक मोठ्या नेत्यांनी मातोश्रीवर ठाकरेंची भेट घेतली आहे. त्यामुळे मातोश्रीची प्रतिष्ठा ठाकरेंच्या चुकीच्या धोरणामुळे लयाला गेलेली आहे का?