डोंबिवली : अयोध्येत प्रभू श्री रामचंद्र यांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते करण्यात आली. हा आनंद व्यक्त करत डोंबिवली पूर्वेकडील बाजीप्रभू चौकात भाजप प्रणित डोंबिवली रिक्षा चालक संघटनेच्या वतीने रिक्षाचालकांना आणि नागरिकांना १५१ किलो लाडू वाटप करण्यात आले.
यावेळी भाजपा कल्याण लोकसभा संयोजक शशिकांत कांबळे, कल्याण जिल्हा सरचिटणीस नंदू परब यासंह दत्ता माळेकर, संजय देसले यांसह अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.यावेळी भाजप कार्यकर्त्यांनी शहरी पोलीस आणि वाहतूक पोलिसांनाही लाडू दिले.
भाजपा कल्याण लोकसभा संयोजक शशिकांत कांबळे म्हणाले, सर्व भारतीयांसाठी २२ जानेवारी हा दिवस म्हणजे दिवाळी सणासारखा आहे. ५५० वर्षाची प्रतीक्षा संपली असून राममंदिर उभा राहण्यामागे हजारो त्याग व बलिदान आहे. भाजपाचा नव्हे ते सकल हिंदू समाजाच्या वतीने देशभर रॅली,कार्यक्रम, दीपोत्सव,ढोल-ताशा माध्यमांतून आनंदोत्सव साजरा केला आहे. त्याप्रमाणे डोंबिवली रिक्षा युनियनेही लाडू वाटप केले आहे. कल्याण जिल्हा सरचिटणीस नंदू परब म्हणाले, डोंबिवली रिक्षा चालक मालक संघटनेचे अध्यक्ष रविंद्र चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली डोंबिवली रिक्षाचालकांना व कामगारांना लाडू दिले. संपूर्ण भारतवासीयांना आनंद होत आहे.तर भाजपा पदाधिकारी दत्ता माळेकर म्हणाले, दोन दिवसांपासून रिक्षाचालक आनंद व्यक्त करत आहेत. सर्व रिक्षांना श्रीराम ध्वज लावण्यात आले आहेत.