ज्ञानवापीतील शिवलिंग आढळलेल्या जागेची स्वच्छता करा : सर्वोच्च न्यायालय
हिंदू पक्षकारांच्या मागणीला आले यश
16-Jan-2024
Total Views |
नवी दिल्ली : हिंदू पक्षकारांच्या माणीनुसार, ज्ञानवापीतील वजूखाना स्वच्छ करण्याचे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने मंगळवार, दि. १६ जानेवारी रोजी दिले आहेत. याच जागेवर हिंदू धर्मीयांचे आस्था असलेले शिवलिंग सापडल्याचा दावा पक्षकारांनी केला हता. दि. १६ मे २०२२ रोजी न्यायालयाच्या सर्वेक्षणात हे शिवलिंग येथे आढळले होते. त्यानंतर लगेचच हा परिसर बंद करण्यात आला होता.
२ जानेवारीला वाराणसीतील जिल्हा दंडाधिकाऱ्यांकडून ज्ञानवापीच्या परिसरातील वजूखाना स्वच्छ करण्याची मागणी करण्यात आली होती. डिसेंबर २०२३ मध्ये येथील पाण्याच्या टाकीतील मासे मृत झाल्याने येथून प्रचंड दुर्गंधी येत होती. हिंदूंची आस्था आणि श्रद्धा या परिसराशी असल्याने हा परिसर दुर्गंधी, मासे आणि अन्य श्वापदांपासून दूर ठेवला पाहिजे, अशी मागणी पक्षकारांनी केली होती. त्यानंतर सर्वोच्च न्यायालयात या प्रकरणी दात मागण्यत आली त्यानुसार हा निर्णय जाहीर करण्यात आला आहे.
या सर्व प्रकाराला ज्ञानवापी व्यवस्थापन समितीला दोषी ठरवण्यात यावे, अशी मागणीही करण्यात आली होती. त्याच वेळी जर हिंदू पक्षकारांच्या मागणीनुसार, माशांना परस्पर हस्तांतरीत केले असते तर ही वेळ आलीच नसती, असेही सांगण्यात आले. वजूखान्यात मुस्लीम समाज नमाजपठणापूर्वी हात-पाय धुवायचे. १६ मे रोजी २०२२ रोजी याच ठिकाणी शिवलिंग सापडल्याचा दावा हिंदू पक्षकारांनी केला. त्यामुळे या वजूखान्यातून पाणी बाहेर काढण्यात आले. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार हा परिसर बंद करण्यात आला होता.