गरोदरपणातील होमियोपॅथीची उपयुक्तता (भाग-2)

    15-Jan-2024
Total Views | 59
homiopathy
 
अनेक स्त्रियांकडून एक प्रश्न सारखा आम्हाला विचारला जातो की, गरोदरपणात होमियोपॅथीची औषधे ही सुरक्षित असतात का? तर याचे जोरदार उत्तर म्हणजे होय, ही औषधे सुरक्षित असतात. गरोदरपणात स्त्रियांना मळमळ, उलट्या, अपचनाचा त्रास, बद्धकोष्टता, विविध प्रकारच्या अ‍ॅलर्जी, निद्रानाश किंवा झोपेचे विकार मानसिक तणाव यांसारख्या अनेक लक्षणांना सामोरे जावे लागते. याव्यतिरिक्त रक्तदाबाचे विकार, मधुमेह, थायरॉईड व श्वसनाचे विकार हेसुद्धा गरोदरपणात काही स्त्रियांमध्ये दिसून येतात. याशिवाय बाळाची वाढ नीट व सुयोग्य पद्धतीने होणेसुद्धा गरजेचे असते. या सर्व विकारांवर होमियोपॅथी समर्थपणे काम करते.
 
गरोदरपणात बाळाची वाढ तपासण्यासाठी सोनोग्राफी करण्यात येते. तसेच या सोनोग्राफी बरोबरच बाळात काही जनुकीय व्यंग किंवा लक्षणे तर नाहीत ना, हे माहिती करण्यासाठी सुद्धा तपासण्या करण्यात येतात. काही स्त्रियांचे सतत गर्भपात होत असतात व काही केल्यास ही शृंखला थांबत नाही. अशा केसेसमध्ये होमियोपॅथीही अत्यंत उपयुक्त ठरते. रुग्णांचा सविस्तर अभ्यास करून दिलेले औषध नुसता गर्भपातच थांबवत नाहीत, तर बाळाचे आरोग्य व वाढ दोन्हीही चांगल्याप्रकारे ठेवते. गेल्या 200 वर्षांमध्ये लाखो महिलांनी होमियोपॅथीचा उपयोग यशस्वीरित्या केला आहे. या इतक्या वर्षांच्या चांगल्या निकालाने होमियोपॅथीची उपयुक्तता ही चिकीत्सकीय व वैद्यकीयदृष्ट्या सिद्ध झालेली आहे. युरोपातील प्रगत अशा फ्रान्समध्ये तर 94 टक्के फार्मसिस्ट गरोदर स्त्रियांना होमियोपॅथीची औषधे घेण्याचा सल्ला देतात.
 
बर्‍याच वेळा असे दिसते की, प्रसूतीच्या वेळी स्त्रियांना प्रसूती कळा बरोबर येत नाही (False labour Pain) अशा काळात काही विशिष्ट होमियोपॅथीक औषधे ठरावीक मात्रेत दिली असता प्रसूतीच्या कळा नीट येतात व डिलिव्हरी चांगली होते. बर्‍याच केसेसमध्ये बाळाची गर्भाशयातील स्थिती (उदा-पायाळू असणे) मुळे डॉक्टरांना सिझेरियनचा निर्णय घ्यावा लागतो किंवा कधीकधी गर्भाशयात बाळ आडवे येते. अशा प्रसंगांतही होमियोपॅथीची औषधे बाळाची स्थिती बदलू शकतात व नॉर्मल डिलिव्हरी होऊ शकते.
होमियोपॅथीची औषधे ही जनुकांवरसुद्धा काम करत असल्यामुळे ज्या स्त्रिया प्रथमपासूनच होमियोपॅथीच्या छत्राखाली असतात, त्यांना गरोदरपणात त्रास जाणवत नाही किंवा जाणवताच तर अतिशय सौम्य असतो. या शिवाय बाळामध्ये जनुकीय व्यंग येण्याच्या प्रकारालासुद्धा आळा घातला जातो.
 
त्याचप्रमाणे एन्डोमेट्रीओसीस, गर्भाशयातील गाठी (फायब्राईइस) पीसीओडी, अंडाशयाच्या गाठी यांसारख्या अनेक विकारांमुळे स्त्रियांमध्ये वंध्यत्वाचे प्रमाण वाढते आहे. अशावेळी योग्य त्या होमियोपॅथीक उपचारांनी आपण या स्त्रियांना मदत करू शकतो. प्रसूतीनंतर मातेला व्यवस्थित दूध न येणे किंवा स्तनांमध्ये गाठी होणे, बाळाला पाजताना मातेला फार वेदना होणे किंवा स्तनांमध्ये दुखणे, याशिवाय मातेचे वजन वाढणे व शरीरातील संप्रेरकांमध्ये गडबड होणे, या आणि अशा अनेक आजारांवर होमियोपॅथीमध्ये रामबाण उपचार आहेत. स्त्रियांनी जर होमियोपॅथीची कास धरली, तर त्यांचे आयुष्य हे अतिशय सुकर होते व त्यांच्याबरोबर त्यांच्या बाळांचेही आरोग्य छान राहते. म्हणूनच मी म्हटले की, होमियोपॅथीही स्त्रियांसाठी जणू वरदानच आहे.
डॉ. मंदार पाटकर
(लेखक एमडी होमियोपॅथी आहेत.) 9869062276
अग्रलेख
जरुर वाचा
Mock Drill India : देशभरात युद्धाचे

Mock Drill India : देशभरात युद्धाचे 'मॉक ड्रील'! ७ 'मे'ला नक्की काय घडणार?

Mock Drill India : पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तान यांच्यातील तणाव शिगेला पोहोचला आहे. भारत-पाकिस्तान युद्धाच्या चर्चा असताना दोन्ही देशांकडून जोरदार शक्तीप्रदर्शन होत असल्याचंही पहायला मिळतंय. दोन्ही देशांमध्ये कोणत्याही क्षणी युद्धाला तोंड फुटण्याची शक्यता आहे. या पार्श्वभुमीवर युद्धसज्जतेच्या दृष्टीने केंद्रीय गृहमंत्रालयाने देशातल्या २४४ जिल्ह्यांमध्ये बुधवार दि. ७ मे रोजी 'मॉक ड्रील' अर्थात युद्धकाळातील उपायांचा सराव करण्याचे निर्देश दिले आहेत. . या २४४ जिल्ह्यांमध्ये महाराष्ट्रातल्या ..

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121