"उद्धव ठाकरे सहकाऱ्यांना ‘सवंगडी’ नाही, ‘घरगडी’ समजतात"; एकनाथ शिदेंचे उद्धव ठाकरेंवर टीकास्त्र
13-Jan-2024
Total Views | 37
मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरेंवर कडाडून टिका केली आहे. ठाकरेंनी १३ जानेवारीला कल्याणच्या दौऱ्यावर असताना एकनाथ शिंदे आणि श्रीकांत शिंदे य़ांच्यावर घराणेशाहीवरुन टिप्पणी केली होती. त्यावर एकनाथ शिंदेंनीही उत्तर दिले आहे. ठाकरेंनी आधी घराणेशाहीची व्याख्या स्पष्ट करावी, त्यांना स्वतःच घर आबाधित ठेवता आल नाही. सर्वांना त्यांनी बाहेर काढल, माझं कुटुंब माझी जवाबदारी एवढच त्यांना ठाऊक आहे अस एकनाथ शिंदेंनी म्हटल आहे.
बाळासाहेब ठाकरे आपल्या कार्यकर्तांना सवंगड्यांसारखे समजायचे, परंतु उद्धव ठाकरे पक्षाला खासगी कंपनी आणि सहकाऱ्यांना सवंगडी नाही घरगडी समजतात आणि नोकरांसारखी वागणूक देतात. त्यामुळे त्यांची ही अवस्था झाली आहे. अस म्हणत मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी ठाकरेंवर टिका केली
राम मंदिराच्या उद्घाटनाच्या २२ जानेवारीला उद्धव ठाकरे नाशिकच्या काळाराम मंदिरात जाणार आहेत. त्यादिवशी महाआरतीसाठी ठाकरेंनी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना आमंत्रित केलं आहे. यावरून शिंदेंनी ठाकरेंना टोला लगावला. ही काय स्पर्धा आहे का? बाळासाहेब ठाकरेंच स्वप्न पंतप्रधान मोदींनी पूर्ण केलं आहे. मंदिर वहीं बनायेंगे तारीख नही बतायेंगे म्हणून हेच मोदीजींची चेंष्ठा करायचे. आता मोदींनी मंदिरही बांधलं, तारीखही सांगितली आणि उद्घाटनही होतंय. विरोधक प्रत्येक गोष्टीत राजकारण करतं आहेत. जनता बरोबर त्यांना उत्तर देईल, असं एकनाथ शिंदे म्हणाले.