राम कृष्ण हरी : काळाराम मंदिरात पंतप्रधान मोदी झाले राम भजनात दंग
12-Jan-2024
Total Views |
नाशिक : पंतप्रधान नरेंद्र मोदी १२ जानेवारीला महाराष्ट्र दौऱ्यावर आहेत. महाराष्ट्रात अनेक विकास कामांच लोकार्पण ते करणार आहेत. सकाळी सुरुवातीला नाशिक आणि दुपारी नवी मुंबई चा दौरा ते करणार आहेत. पंतप्रधान सकाळी नाशिक येथे पोहोचले आहेत.
नाशिकमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींनी रामकुंड येथे गोदावरी पुजा केली व त्यानंतर त्यांनी काळाराम मंदीराकडे रवाना झाले आहेत. काळाराम मंदीरात त्यांच्या हस्ते प्रभू रामचंद्रांची पुजा केली गेली. त्यांनी तेथे गणपतीची व रामांची आरती केली. पंतप्रधान नरेंद्र मोदींची काळाराम मंदिरात त्यांना संस्यानच्या वतिने रामांची मुर्ती भेट म्हणुन देण्यात आली. त्यानंतर मोदी रामांच्या भजनात तल्लीन झालेले पाहायला मिळाले. काहीवेळ भजन करुन पंतप्रधान नरेंद्र मोदी सभास्थळी रवाना झाले.
नाशिक मध्ये येताच नरेंद्र मोदींनी तेथे रोडशो केला, त्यावेळी त्यांच्यासोबत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे उपस्थित होते. नाशिकमध्ये सभेला संबोधित करुन पंतप्रधान मोदी मुंबई कडे रवाना होतील. तेथे ते अटल सेतु म्हणजेच शिवडी न्हावा-शेवा सागरी सेतुचे उद्घाटन करणार आहेत.