मुंबई : छत्रपती शिवाजी महाराजांची वाघ नख आता भारतात येणार आहेत.१६५९ मध्ये विजापूरचा सेनापती अफझलखानाला छत्रपती शिवाजी महाराजांनी ह्यांच वाघ नखांच्या साह्य्याने अफझलखानाला ठार केले होते. दरम्यान ही वाघ नख ब्रिटिशांनी ते ब्रिटनला भेट म्हणून नेले. पण आता ब्रिटनेने ती वाघ नखे भारताला परत करण्याचे मान्य केल्याची बातमी समोर आली आहे.
वाघ नखे भारतात परत आणण्याच्या अधिकृत प्रक्रियेसाठी महाराष्ट्राचे सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार सप्टेंबर २०२३ च्या अखेरीस लंडनला भेट देतील. तेथे ते व्हिक्टोरिया आणि अल्बर्ट म्युझियमसोबत सामंजस्य करार करतील. ही वाघ नखे यांच संग्रहालयात ठेवण्यात आली आहेत. सर्व काही नियोजनानुसार झाले तर 'वाघ नख' या वर्षीच देशात येतील, अशी माहिती मुनगंटीवारांनी दिली.
दरम्यान छत्रपती शिवाजी महाराजांची जगदंबा तलवारही भारत परत येण्याची शक्यता आहे. महाराष्ट्राचे सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार म्हणाले, “आम्हाला यूकेच्या अधिकाऱ्यांकडून पत्र मिळाले आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा वाघाचा पंजा आम्हाला परत देण्याचे त्यांनी मान्य केल्याचे त्यात म्हटले आहे. हिंदू दिनदर्शिकेप्रमाणे छत्रपती शिवाजी महाराजांनी ज्या दिवशी अफझलखानाला मारले त्या तिथीनुसार ती वाघ नखे भारतात आणण्याची योजना आखली जाणार आहे."
मंत्री मुनगंटीवार पुढे म्हणाले, सामंजस्य करारावर स्वाक्षरी करण्यासोबतच यूकेमध्ये प्रदर्शनात असलेली छत्रपती शिवाजी महाराजांची जगदंबा तलवार यासारख्या इतर वस्तूही आम्ही परत आणण्यासाठी पावले उचलू. वाघ नखे परत भारतात आणली जात आहेत, हे मात्र खरे. महाराष्ट्र आणि तेथील जनतेसाठी हे मोठे पाऊल आहे. अफझलखानाच्या वधाची तारीख ग्रेगोरियन कॅलेंडरवर आधारित १० नोव्हेंबर आहे, परंतु आम्ही हिंदू कॅलेंडरप्रमाणे तिथीनुसार तारखा निश्चित करत आहोत. छत्रपती शिवाजी महाराजांचा वाघ नख हा इतिहासाचा अनमोल ठेवा असून त्याच्याशी राज्यातील जनतेच्या भावना जोडल्या गेल्याचेही ते म्हणाले.
वाघाची नखे घेण्यासाठी कोण जाणार लंडनला ?
मंत्री मुनगंटीवार, सांस्कृतिक मंत्रालयाचे प्रधान सचिव डॉ. विकास खारगे आणि राज्याच्या पुरातत्व व वस्तुसंग्रहालय संचालनालयाचे संचालक डॉ. तेजस गर्गे यांच्यासह लंडनला भेट देणार असल्याची माहिती सांस्कृतिक मंत्रालयाने दिली आहे. ही तीन सदस्यीय टीम २९ सप्टेंबर ते ४ ऑक्टोबर या सहा दिवसांच्या दौऱ्यासाठी यूकेला रवाना होणार आहे. अधिका-यांनी सांगितले की, पोलादापासून बनवलेल्या वाघाच्या नखाच्या पंजाला एका पट्टीवर चार पंजे बसवलेले आहेत आणि पहिल्या आणि चौथ्या बोटांना दोन अंगठ्या आहेत.
वाघाची नखे भारतातून ब्रिटनमध्ये कशी पोहोचली?
महाराष्ट्राच्या अधिका-यांच्या म्हणण्यानुसार, वाघ नख हा त्याच्या प्रकारचा पहिला पंजाचा खंजीर आहे जो मुठीत धरला जातो. मोठ्या मांजरींच्या पंजे म्हणजेच सिंह, वाघ, बिबट्या यांच्यापासून प्रेरणा घेऊन त्याची रचना करण्यात आली आहे. हे बोटांच्या सांध्यावर घातले जाते. तळहाताखाली लपवून ते परिधान केले जाऊ शकते. यात ग्लोव्हबॉक्स किंवा क्रॉस बारवर चार ब्लेड निश्चित केले जातात.
हे शत्रूची त्वचा आणि स्नायू फाडण्यासाठी डिझाइन केलेले आहे. ही वाघ नखे सातारा दरबारात छत्रपती शिवाजी महाराजांच्या वंशजांकडे होती. १८१८ मध्ये, ब्रिटिश अधिकारी जेम्स ग्रँट डफ यांना ते भेट म्हणून मिळाले. त्यावेळी डफला ईस्ट इंडिया कंपनीने सातारा संस्थानाचे निवासी राजकीय प्रतिनिधी म्हणून पाठवले होते. १८१८ ते १८२४ पर्यंत त्यांनी साताऱ्याच्या दरबारात काम केले. त्यानंतर ते वाघ नखे घेऊन ब्रिटनला गेले. तेथे त्यांच्या वंशजांनी हे शस्त्र व्हिक्टोरिया आणि अल्बर्ट संग्रहालयाला दान केले.