दिल्ली बनली अभेद्य किल्ला; सुरक्षाव्यवस्था पाहून तुम्हीही व्हाल थक्क

    08-Sep-2023
Total Views |
 G20 Security
 
नवी दिल्ली : जी-२० शिखर परिषदेच्या पार्श्वभूमीवर राजधानी दिल्लीत सुरक्षा व्यवस्थेचा चोख बंदोबस्त करण्यात आला आहे. दिल्ली पोलीस आणि लष्कराचे जवान दिल्लीच्या कानाकोपऱ्यात तळ ठोकून आहेत. मध्य दिल्लीतील अनेक भागात सर्वसामान्य लोकांना जाण्यास मनाई असल्यामुळे काही भागात लॉकडाउन सारखी परिस्थिती निर्माण झाली आहे.
 
 
दिल्ली पोलिसांनी अनेक ठिकाणी वाहतुकीवर बंदी घातली आहे. उद्यापासून जी-२० शिखर परिषदेच्या बैठका होणार आहेत. जगभरातील देशांतील राष्ट्रप्रमुखांच्या सुरक्षेसाठी तपास यंत्रणांनी कंबर कसली आहे. ड्रोनच्या कोणत्याही संभाव्य धोक्यापासून संरक्षणासाठी अँटी-ड्रोन यंत्रणा बसवण्यात आली आहे.
 
 
 
डिफेन्स रिसर्च अँड डेव्हलपमेंट ऑर्गनायझेशन (डीआरडीओ) ने विकसित केलेली भारतीय काउंटर ड्रोन यंत्रणा डिप्लोमॅटिक एन्क्लेव्हमध्ये तैनात करण्यात आली आहे. त्यामुळे भारत मंडपमची सुरक्षा ही अभेद्य झाली आहे.