मुंबई : 'एअर फोर्स स्पोर्टस कंट्रोल बोर्ड'अंतर्गत खेळाडूंची भरती केली जाणार आहे. या भरतीकरिता उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. ०२/२०२३ च्या प्रवेशासाठी अग्निवीर वायू 'क्रीडा' या कोट्यातून भारतीय वायुसेनेमध्ये सहभागी होण्यासाठी उत्कृष्ट पुरुष क्रीडापटूंकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. अधिक माहिती जाणून घेण्यासाठी
अधिकृत वेबसाईटला भेट द्या.
दरम्यान, C-DAC वेबसाईटवर उपलब्ध असलेल्या नोंदणी पोर्टलवरही उमेदवारांनी त्यांची उमेदवारी नोंदणी करणे आवश्यक आहे. दरम्यान, HTTPS://AGNIPATHVAYU.CDAC.IN/CASBSPM या भरती करिता नोंदणी दि. ११ सप्टेंबर २०२३ पासून ते दि. २० सप्टेंबर २०२३ पर्यंत सायंकाळी ५ वाजेपर्यंत खुली करण्यात येईल.