'द प्राइम मिनिस्टर ऑफ भारत',संबित पात्रांनी शेअर केले मोदींच्या इंडोनेशिया दौऱ्याचे पत्र!
06-Sep-2023
Total Views |
नवी दिल्ली : भाजपचे प्रवक्ते संबित पात्रा यांनी सोशल मीडियावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या इंडोनेशिया दौऱ्याची माहिती देणारे पत्र शेअर केले आहे. ज्यावेळी 'इंडिया की भारत' या मुद्द्यावरून राजकीय गदारोळ सुरू आहे. त्याचवेळी पंतप्रधान मोदींना मिळावलेल्या इंडोनेशिया दौऱ्याच्या पत्रात 'द प्राइम मिनिस्टर ऑफ भारत' असे लिहिले आहे. दरम्यान काँग्रेसने गोंधळ घालत भाजपवर टोला लगावला आहे.संबित पात्रा यांनी पोस्ट केलेल्या पत्रात इंग्रजीत माहिती आहे. त्यात 'प्राइम मिनिस्टर ऑफ इंडिया' असे न लिहता. 'प्राइम मिनिस्टर ऑफ भारत' असे लिहण्यात आले आहे.
पीएम मोदी २० व्या आसियान-भारत शिखर परिषद आणि १८ व्या पूर्व आशिया शिखर परिषदेत सहभागी होण्यासाठी दि. ६ सप्टेंबर रोजी रात्री इंडोनेशियाला रवाना होतील. इंडोनेशिया ASEAN (दक्षिणपूर्व आशियाई राष्ट्रांची संघटना) शिखर परिषद आयोजित करत आहे. पंतप्रधान मोदी ७ सप्टेंबरला होणाऱ्या परिषदेला उपस्थित राहणार आहेत. दिल्लीत होणाऱ्या G-20 शिखर परिषदेमुळे पंतप्रधान मोदींची ही भेट खूपच कमी असेल.