राहुलयान कधी लाँच होणार? राजनाथ सिंह यांचा काँग्रेसला सवाल
04-Sep-2023
Total Views |
जयपूर : राजस्थानमध्ये परिवर्तन संकल्प यात्रेला संबोधित करताना संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी काँग्रेस नेते राहुल गांधींवर निशाना साधला आहे. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह म्हणाले की, "चांद्रयानचे प्रक्षेपण आणि लँडिंग यशस्वी झाले, परंतु काँग्रेसचे राहुलयान २० वर्षांपासून प्रक्षेपित होऊ शकले नाही."
संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी यावेळी अशोक गेहलोत यांच्या सरकारमध्ये चालू असलेल्या भ्रष्टाचारावर टीका केली. ते म्हणाले की, "ट्रान्सपरन्सी इंटरनॅशनलच्या अहवालानुसार राजस्थान भ्रष्टाचाराच्या बाबतीत पहिल्या क्रमांकावर आहे. राजस्थानमध्ये पेपर फुटीच्या अनेक घटना घडल्या आहेत."
संरक्षण मंत्री राजनाथ सिंह हे रामदेवरा येथे भाजपच्या तिसऱ्या परिवर्तन संकल्प यात्रेत सहभागी झाले होते. त्यावेळी त्यांनी राज्यातील गेहलोत सरकारवर आणि काँग्रेस पक्षावर जोरदार टीका केली. भाजपाची परिवर्तन संकल्प यात्रा २० दिवसांत राजस्थानमधील ५१ विधानसभा मतदारसंघांना भेट देणार आहे.