ईडीचा मोठा खुलासा! कोविड सेंटरमध्ये बीएमसी अधिकाऱ्यांना वाटलं ६० लाख रुपयांचं सोनं

    30-Sep-2023
Total Views |
 
The Covid Center Scam
 
 
मुंबई : कोविड सेंटर घोटाळ्याप्रकरणी ईडीनं दाखल केलेल्या आरोेपपत्रात धक्कादायक आरोप करण्यात आले आहेत. बीएमसी अधिकारी आणि राजकीय नेत्यांना लाच म्हणून सोन्याचे बार, बिस्किटे आणि नाणी वाटण्यात आली, असा दावा ईडीनं केला आहे. जुलै २०२० ते फेब्रुवारी २०२२ या काळात वरळी आणि दहिसर या दोन कोविड सेंटरमध्ये अनियमितता झाल्याचे ईडीने सांगितले आले. या कालावधीत ३२.४४ कोटी रुपये बेकायदेशीररित्या कमावले गेले. शुक्रवारी (२९ सप्टें.) विशेष न्यायालयाने लाइफलाइन हॉस्पिटल मॅनेजमेंट सर्व्हिसेसचीही दखल घेतली. ज्यांच्या विरोधात ईडीने आरोपपत्र दाखल केले आहे.
 
लाइफलाइन हॉस्पिटल मॅनेजमेंट सेवेच्या भागीदारांपैकी संजय शहा यांनी सोन्याच्या बार, बिस्किटं आणि नाणी खरेदी केले, आणि ते सुजित पाटकर या भागीदाराला दिले. मग पाटकर यांनी ते बीएमसी अधिकारी आणि इतरांना वाटले असा दावा आरोपपत्रात करण्यात आला आहे. सुजित पाटकर यांनी बीएमसी अधिकार्‍यांना रोख रक्कम आणि मौल्यवान वस्तू देखील दिल्याचा आरोप ईडीनं केला आहे.
 
वैद्यकीय कर्मचार्‍यांच्या संख्येवर दुर्लक्ष करण्यासाठी पाटकर यांनी अधिका-यांना रोख रक्कम आणि इतर महागड्या वस्तू भेट दिल्या होत्या. या संपूर्ण प्रकरणावर भाजप नेते किरीट सोमय्या यांनी माहिती दिली. संजय राऊत यांचे पार्टनर सुजित पाटकर यांना राजकीय वरदहस्त असल्यामुळे दहिसर व वरळी कोविड सेंटरचे ₹32.60 कोटींचे कॉन्ट्रॅक्ट मिळाले. ED ने आपल्या आरोपपत्रात म्हटले आहे की या कॉन्ट्रॅक्टचा मोबदला म्हणून नेत्यांना सोन्याची बिस्कीट, नाणी देण्यात आली. हिशोब तर द्यावाच लागणार. असे किरीट सोमय्या म्हणाले.