मुंबई : आगामी विधानसभा निवडणूकांच्या पार्श्वभूमीवर सर्वच राजकीय पक्ष तयारीला लागले आहेत. यातच त्यांच्या एकमेकांवरील टीका टिपण्णींमुळे राजकारण चांगलेच तापले आहे. आता एआयएमआयएमचे आमदार अकबरुद्दीन ओवेसी यांनी राहूल गांधींवर जोरदार टीका केली आहे.
यावेळी अकबरुद्दीन ओवेसी म्हणाले की, "ओवेसी महाराष्ट्रातून आले आहेत, असे आरोप आमच्यावर केले जात आहेत, अरे बाबा मला छेडू नका... काँग्रेसच्या गुलामांनो, मला तुम्हाला विचारायचे आहे की तुमची आई कुठून आली आहे." अशा शब्दांत त्यांनी काँग्रेसवर टीका केली आहे. हैदराबाद येथील एका कार्यक्रमात ते बोलत होते.
दरम्यान, तेलंगणा काँग्रेसचे प्रमुख रेवंत रेड्डी यांनी एआयएमआयएमचे प्रमुख असदुद्दीन ओवेसी हे मूळचे महाराष्ट्राचे असून ते तेलंगणात स्थलांतरित झाले असल्याचे म्हटले होते. यावर प्रतिक्रिया देत आमदार अकबरुद्दीन ओवेसी यांनी काँग्रेसवर जोरदार हल्लाबोल केला आहे.