मुंबई : नवी मुंबईत पोलिसांनी धडक कारवाई करत तब्बल ५ कोटींचे ड्रग्ज जप्त केले आहे. या कारवाईमुळे ड्रग्ज तस्करी करणाऱ्यांना नायजेरियन टोळीला पोलिसांनी जेरबंद केले आहे. तसेच, या प्रकरणात अनेक नायजेरियन नागरिक असून त्यांच्यावर देखील कारवाई करण्यात आली आहे. या कारवाईत नवी मुंबई पोलिसांनी ८९८ ग्रॅम कोकेन, २६७ ग्रॅम एमडी, ४ कोटी ९६ लाख २६ हजार रुपयांच्या प्रतिबंधित ट्रामाडोल हायड्रोक्लोराईडच्या ३६,६४० पट्ट्या जप्त केल्या आहेत.
दरम्यान, नवी मुंबई पोलिसांनी ड्रग्जच्या विरोधात मोठी कारवाई केली असून पोलिसांनी मोठ्या प्रमाणात अमली पदार्थ जप्त केले आहेत. तर अनेक परदेशी नागरिकांचीही चौकशी करण्यात आली असून काहींवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. नवी मुंबईचे पोलिस आयुक्त मिलिंद भारंबे यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आलेल्या या कारवाईत वाशी, कोपरखैरणे, खारघर आणि तळोजा पोलिस ठाण्याच्या हद्दीतील सहा ठिकाणी छापे टाकण्यात आले.
या कारवाईत एकूण ७४ परदेशी नागरिकांची चौकशी करण्यात आली असून एनडीपीएस आणि ऑस्पोर्ट कायद्यांतर्गत एकूण ५ गुन्हे दाखल करण्यात आले असून, या ५ प्रकरणांमध्ये १४ आरोपींविरुद्ध एनडीपीएस कायद्यांतर्गत ३ गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. दरम्यान, नवी मुंबई पोलिसांकडून यासंदर्भात अधिक तपास सुरु आहे.