शहादा : ईदच्या मिरवणूकीत घुसलेल्या समाजकंटकांनी दोन समाजात तेढ निर्माण करणाऱ्या घोषणा दिल्यानंतर शहाद्यात तणाव निर्माण झाला. नंदूरबारमध्ये शुक्रवार, दि. २९ सप्टेंबर रोजी दुपारच्या सुमारास शहाद्यात ईद निमित्त मिरवणूक काढण्यात आली होती. मात्र, याला काही समाजकंटकांनी गालबोट लावण्याचा प्रयत्न केला. मिरवणूक साईबाबा मंदिरानजीक आल्यानंतर घोषणाबाजी सुरू केली.
साईबाबा मंदिराच्या परिसरात काही समाजकंटकांनी थुंकल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला. त्यानंतर स्थानिकांचा रोष उभाळून आला. त्यानंतर वाद सुरू झाले. जमवाकडून शहरातील भवानी चौक कुकडेल परिसरात दगडफेक करण्यात आली. दगडफेकीत लोकांच्या घराबाहेर उभ्या असलेल्या पाच ते सहा वाहनांची तोडफोड करण्यात झाली आहे. या दगडफेकी दरम्यान एका महिलेला मारहाण केल्याचा आरोप केला जात आहे. घराबाहेर ठेवलेल्या वस्तूंची नासधूस करण्यात आली.
तसेच या दगडफेकीत काही जण जखमी झाल्याची माहिती सूत्रांकडून देण्यात आलेली आहे. दरम्यान ह्या दोन गटातील वादानंतर शहरात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला असून वरिष्ठ पोलीस अधिकारी घटनास्थळी दाखल झालेले आहेत. तसेच घटनास्थळी मोठा फौज फाटा रवाना झालेला आहे.
शहाद्यातील एका चौकात दोन गटात वाद झाल्यानंतर जमावाला पांगवण्यात आलेले आहे. त्यानंतर पोलीस बंदोबस्त चोख ठेवण्यात आलेला आहे. कुणीही अफवांवर विश्वास ठेवू नये या भागात आता शांतता प्रस्थापित झालेली आहे. - पी.आर. पाटील, पोलीस अधिक्षक, नंदूरबार