मुंबई : आशियाई क्रीडा स्पर्धेत भारताने चौथे सुवर्णपदक पटकावले आहे. भारताने नेमबाजीत चमकदार कामगिरी करत सुवर्णपदकावर आपले नाव कोरले. मनू भाकर, ईशा सिंग आणि रिदम संगवान या भारतीय महिला नेमबाजी चमूने २५ मीटर पिस्तुल स्पर्धेत सांघिक कामगिरी केली.
दरम्यान, आशियाई क्रीडा स्पर्धेच्या याआधी चौथ्या दिवसाच्या सुरुवातीला सिफ्ट समरा, आशी चौकसे आणि मानिनी कौशिक यांनी ५० मीटर रायफल सांघिक स्पर्धेत सुवर्णपदक जिंकले. तसेच, भारताने आतापर्यंत ४ सुवर्ण. ५ रौप्य आणि ७ कांस्यपदके जिंकली आहेत.