नवी दिल्ली : कोरोनाच्या काळात पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली भारताने संपूर्ण जगाला कोरोना लशींचा पुरवठा केला. तशाच प्रकारे, भारताने जगाला टीबीमुक्त करण्याचे लक्ष्य ठेवले असून लवकरच 'भारत बायोटेक'ने मेड इन इंडिया (स्वदेशी) टीबीवरील लशींचे उत्पादन करणार आहे. दरम्यान, कोविड काळात स्वदेशी लसनिर्मितीमध्ये अग्रणी राहिलेली कंपनी भारत बायोटेक देशांतर्गत लसनिर्मितीसाठी ४ हजार कोटींची गुंतवणूक करण्याच्या प्रयत्नात आहे.
येथे क्लिक करा >> ईको फ्रेंडली गणेशोत्सव साजरा करा, जिंका ५१ हजारांचे बक्षीस!
भारत बायोटेकचे भारत बायोटेकचे कार्यकारी अध्यक्ष, 'कोव्हॅक्सिन' आणि नोझल कोविड लस 'इन्कोव्हॅक'चे निर्माते कृष्णा एला म्हणाले की, टीबी लशीसारख्या त्यांच्या मोठ्या प्रकल्पांवर लक्ष केंद्रित करू इच्छित आहेत, असे सांगतानाच देशातून क्षयरोगाचा नायनाट करण्यासाठी पंतप्रधान मोदींनी पुढाकार घेतला असून आपल्याकडे जगातील सर्वोत्कृष्ट टीबी लसींपैकी एक आहे यासाठी एका स्पॅनिश कंपनीसोबत काम करत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
तसेच, याआधीच फेज २ चा अभ्यास पूर्ण केला असून दक्षिण आफ्रिकेत फेज २३ च्या अभ्यासात प्रवेश केला आहे. ही टीबी लसींच्या नवीनतम पिढीपैकी एक आहे. आम्ही आता स्पॅनिश कंपनीसोबत तंत्रज्ञान हस्तांतरणाच्या टप्प्यात आहोत आणि आम्ही भारतातील परिणामकारक चाचणीसाठी 'आयसीएमआर'सोबत भागीदारी करण्याचा प्रयत्न करत आहोत, असेही ते म्हणाले.