उदयनिधींच्या सनातन विरोधी वक्तव्याला कमल हसन यांचा पाठिंबा!

    23-Sep-2023
Total Views |
Kamal Hasan on Sanatana Dharma

नवी दिल्ली : तामिळनाडूचे मुख्यमंत्री एमके स्टॅलिन यांचे पुत्र उदयनिधी स्टॅलिन यांनी सनातन धर्माबाबत दिलेल्या वक्तव्यामुळे सुरू झालेला वाद थांबत नाही आहे. दरम्यान, आता या सनातन वादात प्रसिद्ध अभिनेते आणि राजकारणी कमल हसन यांनी उदयनिधी यांचा बचाव करत सनातनच्या वादात एका मुलाला लक्ष्य केले जात असल्याचे म्हटले आहे. पेरियार यांच्याकडून आम्हाला सनातनची माहिती मिळाली, असेही कमल हसन म्हणाले.
 
दरम्यान सनातन धर्माबाबत वादग्रस्त वक्तव्य केल्याप्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने तामिळनाडू सरकारमधील मंत्री आणि राज्याचे मुख्यमंत्री एमके स्टॅलिन यांचे पुत्र उदयनिधी स्टॅलिन यांना नोटीस बजावली आहे. त्यांच्याशिवाय सर्वोच्च न्यायालयाने तामिळनाडू सरकार, ए राजा, सीबीआय आणि इतर पक्षांनाही नोटीस बजावली आहे.
 
मात्र, सर्वोच्च न्यायालयाने उदयनिधी यांच्या वक्तव्याला द्वेषयुक्त भाषण मानण्यास नकार दिला आहे. न्यायालयाने या याचिकेची दखल घेत या नोटिसा बजावल्या आहेत, ज्यामध्ये सनातन धर्माबाबत द्वेषपूर्ण विधाने करून हिंदूंच्या भावना दुखावल्याबद्दल वरील सर्वांविरुद्ध एफआयआर नोंदवण्याची मागणी करण्यात आली होती.


अग्रलेख