पंजाब काँग्रेसच्या अध्यक्षांचे खलिस्तानी समर्थक गायक 'शुभ'ला समर्थन; म्हणाले,"तो आमचा..."
22-Sep-2023
Total Views |
मुंबई : भारत आणि कॅनडाच्या संबंधामध्ये तणाव निर्माण झाला आहे. याच तणावाच्या पार्श्वभूमीवर भारताने कॅनडाच्या नागरिकांना भारतात येण्यास बंदी घातली आहे. दोन्ही देशातील बिघडलेल्या संबंधावर राजकीय प्रतिक्रिया येत आहेत. भारतात विरोधी पक्षांनी सुद्धा कॅनडाच्या मुद्द्यावर सरकारचे समर्थन केले आहे. पण पंजाब काँग्रेस कमिटीचे (पीपीसीसी) अध्यक्ष अमरिंदर सिंग राजा वारिंग यांच्या एका विधानाने नव्या वादाला तोंड फुटले आहे.
अमरिंदर सिंग राजा वारिंग यांनी खलिस्तान समर्थक कॅनडियन गायक शुभचे समर्थन केले आहे. अमरिंदर सिंग म्हणाले की, आमचा पक्ष खलिस्तानी विचारांच्या विरोधात आहे आणि अशा कारवायांना प्रोत्साहन देणाऱ्यांनाही विरोध करतो. पण, जर तुम्ही आमचा पंजाबी गायक शुभ सारख्या तरुणांना देशद्रोही ठरवत असाल, तर आम्ही याचा तीव्र विरोध करतो.
कॅनेडियन-पंजाबी गायक शुभने सोशल मीडियावर भारताचा चुकीचा नकाशा पोस्ट केला होता. तेव्हापासून त्याला भारतात जोरदार विरोध झाला. त्यांचा मुंबईतील कार्यक्रमही रद्द करण्यात आला होता. शुभ हा खलिस्तानी आतंकवाद्यांचा समर्थक आहे. त्याने आपल्या इंस्टाग्राम स्टोरीवर भारताचा जळणारा नकाशा पोस्ट केला होता.