मुंबई : देशातील सर्वात मोठी पारेषण कंपनी म्हणून ओळखली जाणारी महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनी अर्थात महापारेषण आता थेट व्हॉट्सॲपद्वारे ‘कनेक्ट’ झाली आहे. महापारेषणच्या सद्यस्थितीतील प्रकल्पांची माहिती, संचलन व कार्यक्रमांची अचूक, अधिकृत माहिती या चॅनेलच्या माध्यमातून आता थेट जनतेपर्यंत पोहोचवली जाणार आहे.
ईको फ्रेंडली गणेशोत्सव साजरा करा, जिंका ५१ हजारांचे बक्षीस!
जगभरात संवादाचे प्रभावी व उपयुक्त माध्यम ठरलेल्या ‘व्हॉट्सॲप’ने चॅनेलच्या माध्यमातून नवीन प्लॅटफॉर्म उपलब्ध करून दिला असून त्यावर आज (दि. २१ सप्टेंबर) महापारेषणने स्वतंत्र चॅनेल सुरु केले आहे. प्रमाणित असलेल्या या चॅनेलला वापरकर्त्यांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून चॅनेल सुरु केल्यानंतर काही वेळेतच वापरकर्त्यांनी चॅनेलला फॉलो केले आहे.
महापारेषणचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक डॉ. संजीव कुमार यांच्या नेतृत्वाखाली राज्यात महापारेषणचे विविध प्रकल्प वेगाने व प्रगतिपथावर सुरू आहेत. महापारेषणच्या विविध प्रकल्पांची अचूक आणि वस्तुनिष्ठ माहिती, जनतेपर्यंत पोहोचविण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्याचे निर्देश अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक डॉ. संजीव कुमार यांनी दिले आहेत. आता हातातील स्मार्ट फोनवर थेट महापारेषणची माहिती मिळत असल्याने हा संवाद अधिक प्रभावी होणार आहे.
महापारेषणच्या जनसंपर्क विभागामार्फत (सांघिक सुसंवाद कक्ष) अधिकारी, कर्मचारी व जनतेला माहिती देण्यासाठी सध्या एक्स (ट्विटर), फेसबुक, इन्स्टाग्राम, यु ट्यूब, थ्रेड्स, टेलिग्राम आदी समाजमाध्यमांचा वापर केला जातो. व्हॉटसॲपने गेल्या आठवड्यात चॅनेलची घोषणा केल्यानंतर महापारेषणने ‘MahaTransco` या नावाने स्वतंत्र, प्रमाणित चॅनेलचा आज ‘श्रीगणेशा’ केला आहे. या चॅनेलला वापरकर्त्यांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून काही तासांतच बहुतांश वापरकर्त्यांनी या चॅनेलचे अनुसरण केले आहे.
चॅनेलला असे करा फॉलो :