मुंबई (विशेष प्रतिनिधी): क्लायमेट अॅक्शनर्स प्रायमर: अ बिगिनर्स टूलकीट या हवामान बदलावरील पुस्तकाचा प्रकाशन सोहळा मुंबईतील भायखळा येथील वीरमाता जिजाबाई भोसले उद्यानात शनिवार दि. १६ सप्टेंबर रोजी आयोजित करण्यात आला होता. हवामान बदलावर कृती करण्याच्या दृष्टिकोनातून हे टूलकीट तयार करण्यात आलं आहे. हा प्रकाशन सोहळा स्प्राउट्स, फ्रेडरिक एबर्ट स्टीनहंग, बृहन्मुंबई महानगरपालिका आणि वीरमाता जिजाबाई भोसले वनस्पती उद्यान यांच्यामार्फत आयोजित करण्यात आला होता. आनंद पेंढारकर, अमृता पाडगावकर आणि राहुल पालेकर यांनी एकत्रितपणे हे पुस्तक लिहिले आहे. क्लायमेट ऍकशनर्स प्रायमर या पुस्तकांच्या मालिकेतील हे पाहिलं पुस्तक आहे.
हवामान बदल ही कोणतीही अफवा नाही तर जगासमोरचा सध्याचा सर्वांत मोठा प्रश्न आहे आणि त्यावर काम करणे गरजेचं आहे, असं आवाहन पर्यावरण तज्ञांनी या पुस्तक प्रकाशन सोहळ्यात केलं. या कार्यक्रमाचे उदघाटन प्रा. सी. गंगाधरण मेनन यांनी केलं. या प्रकाशन सोहळ्याच्या सुरुवातीला स्प्राउट्स संस्थेमार्फत हवामान बदलाशी निगडित काही चित्रांचं प्रदर्शन ठेवण्यात आलं होतं. त्याचबरोबर, इंद्रधनू कलारंग यांच्यामार्फत लोकनृत्य सादर केलं गेलं.
राज्यसभा सदस्य वंदना चव्हाण, राजीव गौडा, अमित सिहाग, डॉ. वैजयंता आनंद, टिकेंदर सिंघ पनवर, अमृता पाडगावकर यांनी चर्चासत्रामार्फत उपस्थितांना मार्गदर्शन केलं. वीरमाता जिजाबाई भोसले वनस्पती उद्यानाचे संचालक संजय त्रिपाठी यांनी प्रास्ताविक केलं. या कार्यक्रमाला ज्येष्ठ कार्यकर्ते डॉ. जी.जी. पारीख यांचीही उपस्थिती लाभली. या कार्यक्रमात टिन्सी बेंजामिन आणि शबिना चौधरी यांनी सांकेतिक भाषेत दुभाषिक म्हणून काम केलं. तर, मांडवी कुलश्रेष्ठ यांनी या कार्यक्रमाच सूत्रसंचालन केलं.
आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.
लेखिका रुईया महाविद्यालयातून पत्रकारितेच्या पदवीधर आहेत. सध्या दै. 'मुंबई तरुण भारत'मध्ये पर्यावरण प्रतिनिधी म्हणून कार्यरत. यापूर्वी विविध 'ह्यूमन इंटरेस्ट स्टोरीज', मुलाखती आणि इतर वार्तांकनासाठी काम. आवाज आणि सूत्रसंचालन या क्षेत्रांमध्ये काम आणि विशेष आवड.